‘टॉमी'च्या तेराव्याचा कार्यक्रम, घरातील पाळीव कुत्र्याच्या मृत्यूनंतर गावजेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 08:59 PM2023-08-10T20:59:04+5:302023-08-10T21:00:11+5:30

उत्तर प्रदेशातूल कुत्र्यावरील प्रेमाचे अनोखे उदाहरण समोर आले आहे.

'Tommy's thirteenth day rituals, Village Dinner After the Death of a Pet Dog in UP | ‘टॉमी'च्या तेराव्याचा कार्यक्रम, घरातील पाळीव कुत्र्याच्या मृत्यूनंतर गावजेवण

‘टॉमी'च्या तेराव्याचा कार्यक्रम, घरातील पाळीव कुत्र्याच्या मृत्यूनंतर गावजेवण

googlenewsNext


अनेकजण आपल्या पाळीव कुत्र्यावर घरातील सदस्याप्रमाणे प्रेम करतात. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून कुत्र्यावरील प्रेमाची अनेक अनोखे उदाहरण समोर आले आहे. येथील बिजरौल गावात टॉमी नावाच्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून गावकऱ्यांनी मिळून शांती यज्ञ आणि तेराव्याचे आयोजन केले. टॉमी उर्फ ​​मुन्ना गावातील लोकांच्या खूप जवळ होता आणि तो दररोज रात्री परिसराचे रक्षण करायचा. टॉमीचा वयाच्या 12 व्या वर्षी 6 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. 

आज टॉमीच्या तेराव्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बिजरौळ गावातील शेकडो ग्रामस्थांनी तेराव्यामध्ये सहभागी होऊन टॉमीला फुले अर्पण केले आणि त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली. टॉमीच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांना धक्का बसला असून, आज संपूर्ण गाव त्याला मिस करत असल्याचे गावकरी सांगतात. 

गावकरी सांगतात की, टॉमी अवघ्या दोन दिवसांचा असताना त्याची आई त्याला सोडून गेली. त्यानंतर गावातील रहिवासी असलेल्या कुसुमलताने त्याला वाढवले ​​आणि आपल्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेतली. त्याला घरातील सदस्याप्रमामे वागणूक मिळायची. टॉमी अनेकदा गावातील लोकांसोबत बाईकवर बसून फिरायचा. तो गावकऱ्यांचा फेवरेट होता. दरम्यान, कुत्र्याच्या तेराव्याची बातमी परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. 

Web Title: 'Tommy's thirteenth day rituals, Village Dinner After the Death of a Pet Dog in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.