पायावर ३ तास वेटोळे घालून होता कोब्रा, महिला करत राहिली शिवशंकराची आराधना, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 15:58 IST2023-08-28T15:57:55+5:302023-08-28T15:58:24+5:30
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील महोबा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे घरात बसलेल्या एका महिलेच्या पायांवर येऊन वेटोळे घालून जवळपास तीन तास बसला होता.

पायावर ३ तास वेटोळे घालून होता कोब्रा, महिला करत राहिली शिवशंकराची आराधना, अखेर...
उत्तर प्रदेशमधील महोबा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे घरात बसलेल्या एका महिलेच्या पायांवर येऊन वेटोळे घालून जवळपास तीन तास बसला होता. मात्र यादरम्यान सापाने त्या महिलेला कुठलीही इजा पोहोचवली नाही. मात्र तो फणा काढून त्याच स्थितीत राहिला. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ही घटना महोबा येथील डहर्रा गावातील आहे. कोब्रा साप या महिलेच्या पायाला तीन तास विळखा घालून होता. या दरम्यान, प्राण वाचवण्यासाठी ही महिला हात जोडून शिवशंकराची प्रार्थना करत होता. सुदैवाने एवढा वेळ विळखा घालून राहिल्यानंतरही सापाने महिलेला दंश केला नाही.
अखेरीच महिलेच्या नातेवाईकांनी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी सर्पमित्राला कळवून महिलेचे प्राण वाचवले.