अमेरिकन सून झाली गावातील ट्रॅक्टरचालकासोबत पसार, पती त्रस्त, पोलीस अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 21:34 IST2023-05-31T21:32:08+5:302023-05-31T21:34:04+5:30
Extra Marrital Affair : अमेरिकेतून आलेली एक सून चक्क गावातील ट्रॅक्टरचालक प्रियकरासोबत फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अमेरिकन सून झाली गावातील ट्रॅक्टरचालकासोबत पसार, पती त्रस्त, पोलीस अवाक्...
प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं. प्रेमामध्ये वय, जात, धर्म, नातं कशाचंही बंधन राहत नाही. दरम्यान, असंच एक प्रेमप्रकरण समोर आलं आहे, ज्याबाबत ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात अमेरिकेतून आलेली एक सून चक्क गावातील ट्रॅक्टरचालक प्रियकरासोबत फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानंतर सदर महिलेच्या पतीने न्यायाची मागणी करत पोलिसांकडे धाव घेतली आहे.
बस्ती जिल्ह्यातील कल्याणपूर गावातील रहिवासी असलेल्या आणि अमेरिेकेत राहणाऱ्या एका तरुणाने पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये त्याने सांगितले की, कल्याणपूर गावात बांध बांधण्याचं काम करत असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाचं त्याच्या ३४ वर्षीय पत्नीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. ती फोनवर नेहमी या ट्रकचालकासोबत बोलायची. त्याला मी आणि माझ्या कुटुंबीयांनी नेहमीच विरोध केला. दरम्यान, मंगळवारी सदर ट्रॅक्टर चालक शेजारील एका मुलीच्या मदतीने माझ्या पत्नीला फूस लावून पळवून घेऊन गेला. तिचा खूप शोध घेतला. मात्र तिची काहीच माहिती मिळाली नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा ती तब्बल दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन पळाल्याचे समोर आले.
याबाबत पोलीस अधिकारी दुर्गेश पांडेय यांनी सांगितले की, या प्रकरणी पीडितेच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. आता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेत तिचा शोध सुरू करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.