शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Crime: कानपूरमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसनं वाढवलं गूढ, पोलीस तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 16:06 IST

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील 'विश्व बँक' परिसरात एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. मृत्युच्या काही काळ आधी तिने ठेवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील 'विश्व बँक' परिसरात एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. मृत्युच्या काही काळ आधी तिने ठेवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी सासरच्या मंडळींची चौकशी सुरू केली असून, शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सोनाली ऊर्फ श्रद्धा असे मृत महिलेचे नाव असून ती मूळची इटावा येथील भरथाना येथील रहिवाशी असून सध्या ती कानपूरमध्ये आपल्या सासरच्या लोकांसोबत राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा सोनाली बेडरूममध्ये एकटीच होती. तिचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला, त्यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी संघर्षाच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्या तरी, परिस्थिती पाहता घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठरतंय चर्चेचा विषय

सोनालीने मृत्युच्या काही वेळापूर्वी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर एक सूचक पोस्ट टाकली. यात तिने लिहिले होते की, "आम्ही आमचे निर्णय उघडपणे घेतो". हे स्टेटस तिचे शेवटचे विचार होते की, एखाद्या घटनेचा इशारा, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या स्टेटसमुळे पोलीस आणि कुटुंबीय दोघेही चक्रावून गेले आहेत.

माहेरच्यांकडून हत्येचा आरोप

सोनालीच्या मृत्युची माहिती मिळताच तिच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. सोनालीच्या भावाच्या म्हणण्यानुसार, "लग्नानंतर काही काळापासून सासरच्यांशी तिचे सतत वाद होत होते. हे प्रकरण आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या आहे." सासरच्या छळामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलले की तिची हत्या करण्यात आली, अशी भिती व्यक्त करत भावाने सखोल चौकशीची मागणी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच डीसीपी दीपेंद्रनाथ चौधरी यांनी पोलीस ताफा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांसह घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण घराची आणि बेडरूमची कसून तपासणी करण्यात आली आहे. "महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पीडित कुटुंबाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला जाईल आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल", असे दीपेंद्रनाथ चौधरी यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kanpur: Married woman's suspicious death; WhatsApp status deepens mystery, police investigate.

Web Summary : A married woman's suspicious death in Kanpur is under investigation. Her WhatsApp status before death raised suspicion. Family alleges murder due to dowry harassment. Police await post-mortem report.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश