Shocking: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूनं मागितला घटस्फोट; कारण ऐकून दोन्ही कुटुंब हादरले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:37 IST2025-12-10T10:24:46+5:302025-12-10T10:37:42+5:30
Uttar Pradesh Shocking News: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून विचित्र प्रकरण समोर आले.

Shocking: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूनं मागितला घटस्फोट; कारण ऐकून दोन्ही कुटुंब हादरले!
उत्तर प्रदेशातीलगोरखपूरमधून विचित्र प्रकरण समोर आले. एका वधूने आपल्या पतीवर शारीरिकदृष्ट्या अक्षम असल्याचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली आहे. वधूच्या वडिलांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.
बेलीपार परिसरातील एका तरुणीने मोठ्या थाटामाटात एका बी.टेक. पदवीधर तरुणाशी लग्न केले, जो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. लग्नाच्या रात्रीनंतर लगेचच पत्नीने पतीवर शारीरिकदृष्ट्या अक्षम असल्याचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना बोलावून घेतले. यावर दोन दिवस चर्चा झाली. मात्र, दोन्ही बाजूंमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही. सहजनवा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर वराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरही, वधू घटस्फोटाच्या मागणीवर ठाम आहे आणि कोणत्याही प्रकारे माघार घेण्यास तयार नाहीत. सहजनवा पोलिसांनी वराच्या वैद्यकीय अहवालाची पडताळणी करण्यासाठी पुढील कारवाई सुरू केली आहे.
सहजनवा पोलिस स्टेशनचे प्रभारी महेश चौबे यांनी सांगितले की, "बेलीपार येथील एका व्यक्तीने त्याच्या मुलीचा पती शारीरिकदृष्ट्या अक्षम असल्याची तक्रार केली. सध्या दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा सुरू आहे. जर सामंजस्याने करार झाला तर ठीक आहे, अन्यथा पोलिस कायदेशीर कारवाई करतील." या विचित्र प्रकरणाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.