शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सीमा आणि सचिनच्या लव्ह स्टोरीचा The End; तिला परत पाकिस्तानात पाठवण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 18:17 IST

पाकिस्तानी सीमा हैदरला एटीएसने ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Seema Haider Sachin Meena : पबजीवरुन ओळख आणि नंतर प्रियकराला भेटण्यासाठी अवैधरित्या नेपाळमार्गे भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदरबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सीमाला पाकिस्तानात परत पाठवण्यात येणार आहे. यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाईदेखील सुरू झाली आहे. 

उत्तर प्रदेशचे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. ते पुढे म्हणाले की, सीमा हैदरची सध्या चौकशी सुरू आहे. सर्व एजन्सी आपापले काम करत आहेत. ही बाब दोन देशांशी संबंधित आहे. पुरावे मिळेपर्यंत काहीही बोलणे योग्य नाही. 

सीमेबाबत नवनवीन खुलासे

सचिन मीनाच्या प्रेमात पडल्यानंतर सीमा हैदर भारतात आली आणि सचिनसोबतच उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहू लागली. अलीकडेच यूपी एटीएसने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चौकशीत सीमाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच तिला परत पाठवण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.

यापूर्वी सीमा हैदरबाबत तपास यंत्रणांना मोठे पुरावे मिळाले आहेत. सीमाला भारतात येण्यासाठी तिसर्‍याने मदत केली आहे. सुरक्षा यंत्रणांची नजर टाळण्यासाठी तिने आपल्या मुलांचा वापर केला. याशिवाय तिला नेपाळमध्ये उपस्थित असलेल्या पाकिस्तानी हस्तकांकडून प्रशिक्षण मिळाल्याचीही माहिती आहे. आता भारतीय गुप्तचर आणि तपास यंत्रणा योग्य तो तपास करत आहेत.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPakistanपाकिस्तानIndiaभारतLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार