उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातील शाळांचे रुपडे पालटले; 'स्मार्ट क्लास'मुळे मुलांना मिळतेय आधुनिक शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:43 IST2025-09-18T16:42:44+5:302025-09-18T16:43:50+5:30

उत्तर प्रदेशात योगी सरकारने सीमावर्ती भागांतील शिक्षणाचे चित्र बदलण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

Schools in the border areas of Uttar Pradesh have changed their face; children are getting modern education thanks to 'smart classes' | उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातील शाळांचे रुपडे पालटले; 'स्मार्ट क्लास'मुळे मुलांना मिळतेय आधुनिक शिक्षण

उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातील शाळांचे रुपडे पालटले; 'स्मार्ट क्लास'मुळे मुलांना मिळतेय आधुनिक शिक्षण

उत्तर प्रदेशात योगी सरकारने सीमावर्ती भागांतील शिक्षणाचे चित्र बदलण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम-२' अंतर्गत राज्यातील सात सीमावर्ती जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 'ऑपरेशन कायाकल्प' या योजनेमुळे आतापर्यंत १९८ गावांमधील २२९ शाळांचा कायापालट करण्यात आला आहे. यामुळे या भागातील मुले आता फक्त बाकावर बसून शिकत नाहीत, तर त्यांना स्मार्ट क्लास आणि टॅबलेटच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण मिळत आहे.

परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश
२०१७ पूर्वी बहराइच, बलरामपूर, खीरी, महाराजगंज, पीलीभीत, श्रावस्ती आणि सिद्धार्थनगर यांसारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये शिक्षणाची अवस्था फारशी चांगली नव्हती. पण, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मुलांना टॅबलेट आणि स्मार्ट क्लासमुळे शिकवणे सोपे झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, व्हिडिओ पाहून मुलांना विषय लवकर समजतो आणि त्यांचा शिक्षणात जास्त रस निर्माण होतो. याचा परिणाम 'व्हायब्रंट व्हिलेजेस'मधील मुलांच्या कामगिरीवर दिसून आला आहे. ग्रेड ३ आणि ग्रेड ६च्या 'परख' परीक्षेत या मुलांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.

डिजिटल सुविधांचा लाभ
शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, १५२ शाळांनी सर्व १९ निकष पूर्ण केले आहेत, तर इतर शाळांनीही महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. या शाळांमध्ये आता पिण्याचे पाणी, शौचालय, वीज आणि फर्निचर यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. या जिल्ह्यांमधील २१ ब्लॉकमधील सर्व शाळांमध्ये प्रत्येकी २ टॅबलेट देण्यात आले आहेत. 'गावातील शाळेत मोबाईलसारखा टॅबलेट मिळेल असे कधी वाटले नव्हते,' असे येथील विद्यार्थी सांगतात. यामुळे मुले आता टॅबलेटवर गोष्टी वाचतात आणि खेळातून गणित शिकत आहेत.

प्रवेशाच्या संख्येत वाढ
गेल्या पाच वर्षांत या सीमावर्ती जिल्ह्यांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या वाढली आहे. २०२४-२५मध्ये ही संख्या ३८.४५ लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये खीरी जिल्ह्यात सर्वाधिक (जवळपास ८.९ लाख) विद्यार्थी आहेत. बहराइच, बलरामपूर आणि सिद्धार्थनगरमध्येही प्रवेशाची संख्या वाढली आहे. यावरून स्पष्ट होते की, सरकारी योजना, कायाकल्प कार्यक्रम आणि स्मार्ट स्कूल प्रकल्प यांचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे. या सुधारणांमुळे येणाऱ्या काळात या भागांमध्ये शिक्षणाचे प्रमाण आणखी वाढेल, अशी आशा आहे.

Web Title: Schools in the border areas of Uttar Pradesh have changed their face; children are getting modern education thanks to 'smart classes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.