'राम…सियाराम….सियाराम…जय जय राम', CM योगींसमोर मुस्लिम तरुणाने गायले राम भजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 16:38 IST2024-02-04T16:36:42+5:302024-02-04T16:38:48+5:30

श्रीराम भजन ऐकून मुख्यमंत्र्यांनीही पाठीवर कौतुकाची थाप दिली.

'Ram Siyaram Siyaram Jai Jai Ram', Muslim youth sang Ram Bhajan in front of CM Yogi adityanath | 'राम…सियाराम….सियाराम…जय जय राम', CM योगींसमोर मुस्लिम तरुणाने गायले राम भजन

'राम…सियाराम….सियाराम…जय जय राम', CM योगींसमोर मुस्लिम तरुणाने गायले राम भजन

UP News: काही दिवसांपूर्वीच अयोध्येत भगवान श्रीराम भव्य मंदिरात विराजमान झाले. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अवघा देश राममय झाला आहे. उत्तर प्रदेशात तर सर्वत्र रामधून ऐकू येत आहे. अशातच गोरखपूरमधून एका मुस्लिम रामभक्ताचा व्हिडिओ मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम व्यक्ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर राम भजन गाताना दिसत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गोरखपूरचा आहे. सीएम योगी शनिवारी दिव्य कला आणि कौशल्य प्रदर्शन कार्यक्रमात सहभागी झाले होते. देवरियातील भाजप आमदार शलभ मणी त्रिपाठी यांनीही हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शेअर करण्यात आला, जो रात्री 8 वाजेपर्यंत सुमारे 50 हजार लोकांनी पाहिला आहे. 

सीएम योगी आदित्यनाथ यांना पाहताच त्या मुस्लिम व्यक्तीने 'गुरू ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरू साक्षात् परब्रह्म, तस्मै गुरुवे नमः' श्लोक म्हटला. यानंतर प्रसिद्ध श्रीराम भजनातील दोन ओळींचे पठण केले आणि शेवटी राम…सियाराम….सियाराम…जय जय राम म्हणत भजनाचा शेवट केला. मुस्लिम व्यक्तीने हे भजन गायल्यानंतर सीएम योगींनी त्याचे कौतुक केले आणि पाठीवर कौतुकाची थापही दिली. यावेळी गोरखपूरचे खासदार रवी किशन हेदेखील तिथेच उपस्थित होते.

Web Title: 'Ram Siyaram Siyaram Jai Jai Ram', Muslim youth sang Ram Bhajan in front of CM Yogi adityanath