ना NDA, ना I.N.D.I.A. ... मायावतींनी निवडली 'वेगळी वाट'; स्वबळावर निवडणूक लढवणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:53 AM2023-08-30T11:53:21+5:302023-08-30T11:54:03+5:30

मायावती या भाजपा विरोधात I.N.D.I.A. आघाडीत सामील होतील अशी रंगली होती चर्चा

Neither NDA nor I.N.D.I.A. Mayawati says BSP will contest alone in upcoming Lok Sabha and Vidhan Sabha elections 2024 | ना NDA, ना I.N.D.I.A. ... मायावतींनी निवडली 'वेगळी वाट'; स्वबळावर निवडणूक लढवणार!

ना NDA, ना I.N.D.I.A. ... मायावतींनी निवडली 'वेगळी वाट'; स्वबळावर निवडणूक लढवणार!

googlenewsNext

Mayawati for 2024 Elections: बसपाच्या प्रमुख मायावती यांनी कोणत्याही राजकीय आघाडीत समाविष्ट न होता, लोकसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. मायावती यांनी बसपा विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम लावला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे बसपाच्या मायावती यांनी स्पष्ट केले. बसपा I.N.D.I.A. आघाडीमध्ये सामील होऊ शकते असे बोलले जात होते. त्यासाठी संपूर्ण प्लॅनिंगही केले जात असल्याची माहिती होती. यूपीमध्ये दलित समाजातील ब्रिजलाल खबरी यांना काँग्रेसने काढून टाकले होते, त्यामुळे असा संदेश गेला की मायावतींना शह देण्यासाठी यासाठी त्यांनी खबरी यांना हटवून यूपीची कमान अजय राय यांच्याकडे सोपवली होती. पण अखेर आता मायावतींनी वेगळी वाट निवडली आहे.

मायावतींनी ट्विट करून अशा सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर सांगितले की NDA आणि I.N.D.I.A आघाडी बहुतेक गरीब विरोधी, जातीयवादी, सांप्रदायिक भांडवलशाही धोरणे असलेले पक्ष आहेत, ज्यांच्या धोरणांविरुद्ध भाजपा सतत लढत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असेही मायावती म्हणाल्या. भारताच्या विरोधी आघाडीत बसपा सामील होण्याच्या चर्चेला पूर्णपणे फेटाळून लावत पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी त्या कोणत्याही आघाडीत नसतील. बसपा एकट्याने निवडणूक लढवणार आहे.

विरोधकांची हेराफेरी करण्यापेक्षा, समाजातील तुटलेल्या आणि दुर्लक्षित करोडो लोकांना परस्पर बंधुभावाच्या आधारे जोडून त्यांची युती 2007 प्रमाणे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका चार राज्यांत एकट्याने लढवणार आहे. त्यामुळे माध्यमांनी पुन्हा पुन्हा गैरसमज पसरवू नयेत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Neither NDA nor I.N.D.I.A. Mayawati says BSP will contest alone in upcoming Lok Sabha and Vidhan Sabha elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.