छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 20:00 IST2025-10-27T19:59:46+5:302025-10-27T20:00:33+5:30
ही घटना बबुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोदोचक गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, छठपूजेसाठी हजारो लोक येथील चंद्रप्रभा नदीवर पोहोचले होते. नदीत एक जुगाड केलेली नाव (होडी) होती. काही लोक या नावेवर चढले आणि पूजेदरम्यान सेल्फी घेऊ लागले होते.

प्रतिकात्मक फोटो...
उत्तर प्रदेशातील चंदौली येथे सोमवारी छठ पूजेदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. येथे लोक सेल्फी घेत असतानाच एक नाव उलटली. या नावेवरील अनेक जण नदी पात्रात बुडाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. यावेळी घाटावर असलेल्या काही स्थानिक लोकांनी तत्काळ नदपात्रात उड्या घेत चार जणांना जीव वाचवल्याचे समजते. इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसही गोताखोरांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ही घटना बबुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोदोचक गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, छठपूजेसाठी हजारो लोक येथील चंद्रप्रभा नदीवर पोहोचले होते. नदीत एक जुगाड केलेली नाव (होडी) होती. काही लोक या नावेवर चढले आणि पूजेदरम्यान सेल्फी घेऊ लागले. दरम्यान, नावेचा तोल गेला आणि नावेतील सर्व लोक पाण्यात पडले. हे लोक नदीपात्रात पडताच एकच आरडाओरड सुरू झाली.
यानंतर, घाटावर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि कसेबसे चार जणांना सुखरूप बाहेर काढले. आणखी काही लोक पाण्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस गोताखोरांसह घटनास्थळी पोहोचले असून गोताखोर बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत.