मथुरेमध्ये मोठी दुर्घटना, मंदिराजवळचा सज्जा कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 22:56 IST2023-08-15T22:56:07+5:302023-08-15T22:56:51+5:30
Mathura: उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील बांके बिहारी मंदिरजवळ सज्जा कोसळला आहे. जुन्या घराचा सज्जा कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बांके बिहारी मंदिरापासून सुमारे १५० मीटर अंतरावर घडली आहे.

मथुरेमध्ये मोठी दुर्घटना, मंदिराजवळचा सज्जा कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील बांके बिहारी मंदिरजवळ सज्जा कोसळला आहे. जुन्या घराचा सज्जा कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बांके बिहारी मंदिरापासून सुमारे १५० मीटर अंतरावर घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये ८ ते १० भाविक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दुर्घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मथुरेचे जिल्हाधिकारी पुलकित खरे यांनी या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.