हर हर शंभू...गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या यू-ट्युब सिंगरच्या भावाची हत्या, तीन हल्लेखोरांनी घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 16:31 IST2023-08-06T16:29:44+5:302023-08-06T16:31:45+5:30
Farmani Naaz's brother killed: उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी प्रसिद्ध यू-ट्युब सिंगर फरमानी नाज हिच्या चुलत भावाची चाकूने भोसकून हत्या केली.

हर हर शंभू...गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या यू-ट्युब सिंगरच्या भावाची हत्या, तीन हल्लेखोरांनी घेतला जीव
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी प्रसिद्ध यू-ट्युब सिंगर फरमानी नाज हिच्या चुलत भावाची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. याबाबतची माहिती मिळताच रतनपुरी ठाणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यांनी मृताच्या शरीराचा पंचनामा करत ते पोस्टमार्टेमसाठी पाठवले.
या प्रकरणी पोलिसांकडून कुठलाही अधिकारी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास तयार नाही आहे. ही भयानक घटना रतनपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोहम्मदपूर माफी येथे घडली आहे. येथे शनिवारी संध्याकाळी सुमारे ७.४५ च्या सुमारास खुर्शिद नावाच्या एका तरुणावर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार हत्यारांच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये खुर्शीद गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी जखमी खुर्शिदला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारांदरम्यान, त्याला डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास करून मृत खुर्शिद याचा मृतदेह पंचनामा करून पोस्टमार्टेमसाठी पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार मृत खुर्शिद हा तरुण प्रसिद्ध लोकसंगीत गायिका फरमानी नाज हिचा चुलत भाऊ आहे. या घटनेबाबत माहिती देताना गावचे प्रमुख परवेज सिद्धकी यांनी सांगितले की, संध्याकाळी सुमारे ७.४५ च्या दरम्यान, ही घटना घडली. मृत तरुणाचं नाव खुर्शिद असं असून, तो संध्याकाळी सुमारे ७.३० वाजता नमाज पढून आला होता. तसेच जेवण करून रस्त्यावर फिरायला गेला होता. गावापासून सुमारे दिडशे मीटर पुढे तिघे जण दुचाकीवरून आले. त्यांनी काही विचारणा न करता त्याच्यावर हल्ला केला. आमच्या गावात यापूर्वी अशी घटना कधी घडली नव्हती. यामध्ये तीन जणांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मृत तरुण हा फरमानी नाज हिच्या काकांचा मुलगा होता.