शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ड्रोनचा पहारा, 10 हजारहून अधिक CCTV अन् 7 लेअरची सुरक्षा व्यवस्था; प्राणप्रतिष्ठेपूर्वी अभेद्य किल्ला बनली अयोध्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 5:10 PM

Pran Pratishtha Security : अशी असेल पंतप्रधानांसाठीची सुरक्षा व्यवस्था...

राम मंदिरात प्रभू रामचंद्र यांच्या प्राण-प्रतिष्ठेपूर्वी अयोध्येला एखाद्या अभेद्य किल्ल्याचे स्वरूप आले आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या उपस्थिती पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी जवळपास 8000 व्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार आहे. आता ड्रोनच्या सहाय्याने येथील सिक्योरिटी मॉनिटरिंग होणार आहे. येथे 10 हजार हून अधिक सीसीटीव्ही इंस्टॉल करण्यात आले आहेत, जे जागो-जागी लक्ष ठेवतील. तर जाणून घेऊयात कशी असेल अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था...

सात लेअरची असेल सुरक्षा व्यवस्था - प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमावेळी अयोध्येत अचूक सुरक्षा व्यवस्था रहावी यासाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या सुरक्षा संस्थांनी एकत्रितपणे 7 लेअरची सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. याच्या पहिल्या लेअरमध्ये SPG कमांडो असतील, ज्यांच्या जवळ आत्याधुनिक शस्त्रे असतील. दुसऱ्या घेऱ्यात NSG चे जवान असतील. तिसऱ्या घेऱ्यात IPS अधिकारी सुरक्षेची जबाबदारी पार पाडतील. चौथ्या घेऱ्याची जबाबदारी CRPF च्या जवानांवर असेल. पाचव्या घेऱ्यात उत्तरप्रदेश एटीएसचे कमांडर असतील. जे कुठल्याही संशयास्पद परिस्थितीत अॅक्शनसाठी तयार असतील. सहाव्या घेऱ्यात आयबी आणि सातव्या घेऱ्यात स्थानीक पोलिसांची फौज तैनात असेल.

अशी असेल पंतप्रधानांसाठीची सुरक्षा व्यवस्था - सर्वाधिक सुरक्षितता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सुनिश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा घेऱ्यात तीन DIG, 17 SP, 40 ASP, 82 DSP आणि 90 इंस्पॅक्टर्ससह 1000 हून अधिक  कॉन्स्टेबल आणि 4 कंपनी पीएसी तैनात असतील. येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी 10 हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत. ज्या लोकांच्या दुकानांसमोर आणि घरांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, त्यांनाही पोलीस कंट्रोल रूमला जोडण्यात आले आहे.

अँटी ड्रोन सिस्टिमही इस्टॉल -सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग म्हणून, कार्यक्रमादरम्यान कुठल्याही हवाई हल्ल्यापासून सुरक्षिततेसाठी ड्रोनविरोधी यंत्रणांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजेंसने सुसज्ज अशा कमांड कंट्रोल सिस्टिम तयार करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात एबीपी न्यूज सोबत बोलताना एसपी प्रवीण रंजन यांनी सांगितले की, राम मंदिराच्या सुरक्षिततेसाठी सीआरपीएफच्या 6 कंपन्या, पीएसीच्या 3 कंपन्या, एसएसएफच्या 9 कंपन्या आणि एटीएस आणि एसटीएफची प्रत्येकी एक तुकडी 24 तास तैनात असेल.

स्नायपर्सदेखील तैनात -याशिवाय, 300 पोलीस, 47 अग्निशमन दलाचे कर्मचारी, 40 रेडिओ पोलीस कर्मचारी, 37 स्थानिक गुप्तचर, 2 बॉम्ब शोधक पथके आणि 2 अँटी सबोटाज पथके तैनात करण्यात आली आहेत. यांना केवळ कार्यक्रमाच्या ठिकाणीच नाही तर मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर आणि चौकांवरही तैनात केले जाईल. जेणेकरुन कोणतीही घुसखोरी रोखता येईल. प्रत्येकावर नजर ठेवली जात आहे आणि संशयास्पद दिसणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली जात आहे, असेही रंजन यांनी सांगितले. याशिवाय स्नायपर्सदेखील तैनात असणार आहेत.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSoldierसैनिकPoliceपोलिसNarendra Modiनरेंद्र मोदी