प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी सायकलिंग, सामाजिक जागृतीचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 12:10 PM2024-01-20T12:10:50+5:302024-01-20T12:11:07+5:30

कोणी शेकडो किमी सायकल प्रवास करून, कोणी स्केटिंग करत व सामाजिक जागृतीचा संदेश देत अयोध्येत दाखल होणार आहेत.

Cycling to see Lord Ramchandra, a message of social awareness | प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी सायकलिंग, सामाजिक जागृतीचा संदेश

प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी सायकलिंग, सामाजिक जागृतीचा संदेश

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे भगवान रामाच्या मंदिरात दि. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून लोक या शहरात दाखल होत आहेत. त्यात विविध धर्मांच्या लोकांचा समावेश आहे.

कोणी शेकडो किमी सायकल प्रवास करून, कोणी स्केटिंग करत व सामाजिक जागृतीचा संदेश देत अयोध्येत दाखल होणार आहेत. बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील नितीशकुमार (वय २१ वर्षे) हे ६१५ किमीचा सायकलप्रवास करून अयोध्येत दाखल झाले आहेत. यासाठी त्यांना सात दिवस लागले. 

हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी मुंबईहून शबनम शेख या पायी चालत अयोध्येला निघाल्या आहेत. त्या १,४०० किमी चालणार आहेत. रोज ६० किमी अंतर चालून त्या अयोध्या गाठणार आहेत. कर्नाटकमधील मुत्तणा तिर्लापुरा यांनी महात्मा गांधी यांची वेशभूषा केली असून, ते दोन हजार किमीची पायी प्रवास करून अयोध्येत येतील.

Web Title: Cycling to see Lord Ramchandra, a message of social awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.