"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 19:37 IST2025-09-14T19:34:36+5:302025-09-14T19:37:17+5:30
Yogi Adityanath : जर एखादी व्यक्ती किंवा संस्था सातत्याने अधोगतीकडे जात असेल तर ती विकृती आहे. याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीने निर्णय घेतला आणि तो निर्णय व्यापक जनहित आणि राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती आहे. याच संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, डॉ. राम मनोहर लोहिया आयुर्विज्ञान संस्थान.

"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण
लखनऊ: आपल्या जीवनात तीन अवस्था असतात, पहिली प्रवृत्ती, दुसरी विकृती आणि तिसरी संस्कृती. यांपैकी परिस्थिती आहे तसे राहणे ही प्रवृत्ती आहे. माणसाला बदल हवा असतो, मात्र, तो स्वतःमध्ये बदल करण्यासाठी कचरतो. जर एखादी व्यक्ती किंवा संस्था सातत्याने अधोगतीकडे जात असेल तर ती विकृती आहे. याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीने निर्णय घेतला आणि तो निर्णय व्यापक जनहित आणि राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती आहे. याच संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, डॉ. राम मनोहर लोहिया आयुर्विज्ञान संस्थान. या संस्थेने अवघ्या 19 वर्षांत 20 खाटांपासून 1,375 खाटांपर्यंत विस्तार केला आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते शनिवारी इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे आयोजित डॉ. राम मनोहर लोहिया आयुर्विज्ञान संस्थानच्या स्थापना दिना निमित्त आयोजित समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी 298 कोटींच्या प्रकल्पांचेह लोकार्पण आणि शिलान्यास केला.
काळाच्या गतीपेक्षा दोन पावले पुढे राहण्यासाठी तयार रहा -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, देश आणि व्यक्तीची गती ही काळाची गती आहे. आपण काळाच्या गतीपेक्षा दोन पावले पुढे राहण्यासाठी तयार असले पाहिजे. जो व्यक्ती, समाज किंवा देश काळाची गती ओळखू शकत नाही, तो काळाच्या तडाख्यात येतो. कारण काळाची गती तीच आहे, ज्याबद्दल डॉ. श्याम नारायण पांडेय म्हणाले होते की, हे महाकालाचा आसन आहे, यावर कुणाचेही शासन चालत नाही.
योगी पुढे म्हणाले, जर कुणाला वाटत असेल की, मी काळाची गती रोखू शकतो, तर हा त्याचा गैरसमज आहे. यामुळे आपल्याला काळाच्या गतीपेक्षाही दोन पावले पुढे चालावे लागेल. जर आपण या गतीने चाललो, तर प्रगती करू; जर चालू शकत नसू, आपण केवळ काळानुसारच स्वत:ला ढाळत असू, तर लोक आपल्याला यथास्थितिवादी म्हणून ओळखतील. आपण कधी आलो, कधी गेलो, हे कुणाला समजणारही नाही. आणि आपल्यामुळे संस्थेचे नुकसान होत असेल, तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.
काळाच्या गतीच्या बाबतीत या संस्थेने चांगली प्रगती केली आहे. यामुळेच संस्थेने अवघ्या पाच वर्षांत राज्यातील टॉप तीन वैद्यकीय संस्थांमध्ये आपले नाव कोरले आहे. यांपैकी पहिली केजीएमयू 110 वर्षे पूर्ण केली आहेत, दुसरी एसजीपीजीआय जवळपास चार दशके जुनी आहे, तर लोहिया संस्थानाने कमी कालावधीत मोठी भरारी घेतली आहे आणि राज्यातील टॉपचे तिसऱ्या क्रमांकाचे वैद्यकीय संस्थान बनले आहे. ही यशस्विता दर्शवते की आपली दिशा आणि नेतृत्व योग्य आहे. आपण योग्य दिशेने जात आहोत. यात अनेक भौतिक आव्हाने येतात, पण जर टीमवर्क असेल, काम करण्याचा उत्साह असेल, तर तो लोकांच्या मनात नवीन उत्साह निर्माण होतो.