पाळण्यात झोपलेल्या चिमुकल्यावर पडले म्हशीचे शेण, गुदमरुन जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 17:58 IST2023-12-08T17:58:35+5:302023-12-08T17:58:48+5:30
या घटनेने कुटुंबात शोककळा पसरली आहे.

पाळण्यात झोपलेल्या चिमुकल्यावर पडले म्हशीचे शेण, गुदमरुन जागीच मृत्यू
UP News:उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील कुलपहार येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. म्हशीने पाळण्यात झोपलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर शेण टाकले आहे. या घटनेत गुदमरुन त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा अशाप्रकारे अंत झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आईने सहा महिन्यांच्या मुलाला गोठ्याजवळ पाळण्यात झोपवले होते. सायंकाळच्या सुमारास म्हशीने शेण टाकले, हे शेण त्या पाळण्यात झोपलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर पडले. यामुळे मुलाचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे वडील मुकेश यादव आणि आई निकिता यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.