बहराइच हिंसाचार: नखं उपटली, करंट लावला आणि... रामगोपालची छळ करू हत्या, धक्कादायक माहिती समोर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 12:54 IST2024-10-16T12:22:16+5:302024-10-16T12:54:25+5:30

Bahraich violence: दुर्गामूर्ती विसर्जनादरम्यान, झालेल्या वादानंतर उत्तर प्रदेशमधील बहराइच शहरामध्ये उफाळलेल्या हिंसाचारामध्ये रामगोपाल मिश्रा या तरुणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, रामगोपाल याची हत्या करण्यापूर्वी त्याच्यासोबत करण्यात आलेल्या क्रौर्याबाबत धक्कादायक माहिती पोस्टमार्टेमच्या अहवालामधून समोर आली आहे.

Bahraini violence: Nails pulled, electrocuted and... Ramgopal tortured to death, shocking information revealed    | बहराइच हिंसाचार: नखं उपटली, करंट लावला आणि... रामगोपालची छळ करू हत्या, धक्कादायक माहिती समोर   

बहराइच हिंसाचार: नखं उपटली, करंट लावला आणि... रामगोपालची छळ करू हत्या, धक्कादायक माहिती समोर   

दुर्गामूर्ती विसर्जनादरम्यान, झालेल्या वादानंतर उत्तर प्रदेशमधील बहराइच शहरामध्ये उफाळलेल्या हिंसाचारामध्ये रामगोपाल मिश्रा या तरुणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, रामगोपाल याची हत्या करण्यापूर्वी त्याच्यासोबत करण्यात आलेल्या क्रौर्याबाबत धक्कादायक माहिती पोस्टमार्टेमच्या अहवालामधून समोर आली आहे. पोस्टमार्टेममधून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी रामगोपालची हत्या करण्यापूर्वी क्रौर्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या, आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर धारदार हत्याराने त्याच्यावर वार केले. तसेच रामगोपाल याच्या शरीरामध्ये तब्बल ३५ छर्रे लागल्याच्या खुणा सापडल्या आहे. रामगोपालच्या मृतदेहाच्या करण्यात आलेल्या पोस्टमार्टेममधून या क्रुरकृत्याच्या उलगडा झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२ वर्षीय रामगोपाल मिश्रा याती हत्या करण्यापूर्वी त्याचे हालहाल करण्यात आले. विजेचे धक्के बसल्याने आणि हॅमरेज झाल्याने रामगोपालचा मृत्यू झाल्याचा उल्लेख पोस्टमार्टेमच्या अहवालामध्ये आहे. दरम्यान, मृत रामगोपालच्या शरीरावर छर्रे लागल्याच्या ३५ खुणा सापडल्या आहेत. तसेच शरीरावर धारदार हत्याराने वार केल्याच्या खुणाही सापडल्या आहेत.

एवढंच नाही तर रामगोपाल याच्या पायाची नखं खेचून काढल्याचंही पोस्टमार्टेमदरम्यान समोर आलं. तसेच हत्या करण्यासाठी रामगोपाल याला विजेचे धक्के देण्यात आले. तसेच डोळ्यांजवळ टोकदार हत्यारांनी धावही करण्यात आले.  

बहराइच जिल्ह्यातील महसी तालुक्यामधील महराजगंज येथे मूर्तीविसर्जनादरम्यान झालेल्या वादानंतर आरोपींनी रामगोपाल याचं अपहरण करून त्याची हत्या केली होती. दरम्यान, रामगोपाल याचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात छळ करण्यात आल्याचेही समोर आले होते.    

Web Title: Bahraini violence: Nails pulled, electrocuted and... Ramgopal tortured to death, shocking information revealed