अयोध्येतील भव्य राम मंदिर अंतराळातून कसे दिसते? ISRO ने दाखवली एक अद्भुत झलक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 12:20 PM2024-01-21T12:20:47+5:302024-01-21T12:23:11+5:30

सॅटेलाइट फोटोंमध्ये दशरथ महाल आणि शरयू नदीही स्पष्टपणे दिसत आहे

Ayodhya Ram Mandir ISRO Shows Temple From Space Using Indigenous Satellites Sarayu river Dashrath Mahal images | अयोध्येतील भव्य राम मंदिर अंतराळातून कसे दिसते? ISRO ने दाखवली एक अद्भुत झलक!

अयोध्येतील भव्य राम मंदिर अंतराळातून कसे दिसते? ISRO ने दाखवली एक अद्भुत झलक!

Ram Mandir View from Space by Isro : उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन सोमवारी होणार आहे. याशिवाय याच दिवशी रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रमही आहे. या दरम्यान, भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. सॅटेलाइट फोटोंमध्ये दशरथ महाल आणि शरयू नदीही स्पष्टपणे दिसत आहे. सॅटेलाइट फोटोमध्ये नूतनीकरण केलेले अयोध्या रेल्वे स्थानकही दिसत आहे. भारताकडे सध्या ५० हून अधिक उपग्रह अवकाशात आहेत. त्यापैकी काहींची व्यापकता एक मीटरपेक्षा कमी आहे. हैदराबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राने अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराचे छायाचित्र काढण्याचे काम केले आहे.

भव्य श्री राम मंदिर २.७ एकरात पसरले आहे

ISRO ने प्रसिद्ध केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये २.७ एकरात पसरलेल्या श्री राम मंदिराची जागा स्पष्टपणे दिसू शकते. उपग्रहांच्या भारतीय रिमोट सेन्सिंग सिरीजचा वापर करून त्याचे तपशीलवार दृश्य देखील दर्शविले गेले आहे. अयोध्येतील रामललाच्या सोहळ्यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) स्वदेशी उपग्रहाचा वापर करून अंतराळातून भव्य राम मंदिराची पहिली झलक दाखवली आहे.

इस्रोने ओळखळी रामललाची मूर्ती बसवण्याची जागा

मंदिराच्या बांधकामाच्या इतर टप्प्यांमध्येही इस्रो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अयोध्येतील या भव्य प्रकल्पातील एक मोठे आव्हान म्हणजे प्रभू रामाची मूर्ती बसवण्याची नेमकी जागा ओळखणे. मंदिराच्या बांधकामादरम्यान प्रभू रामाचे नेमके स्थान ओळखण्याची जबाबदारीही इस्रोकडे सोपवण्यात आली होती. राम मंदिर ट्रस्टला प्रभू रामाची मूर्ती ३x६ फूट जागेवर ठेवायची होती. जिथे रामाचा जन्म झाला असे मानले जाते.

मोठ्या संख्येने व्हीव्हीआयपी अयोध्येला पोहोचणार

अयोध्येतील श्री राम मंदिराचे सोमवारी उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने व्हीव्हीआयपी अयोध्येत पोहोचत आहेत. राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलला प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या सहभागात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे.

Web Title: Ayodhya Ram Mandir ISRO Shows Temple From Space Using Indigenous Satellites Sarayu river Dashrath Mahal images

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.