श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 14:41 IST2023-09-25T14:41:33+5:302023-09-25T14:41:33+5:30
अयोध्येचे सौंदर्य वाढवण्यासाठी 20 एकर परिसरात भव्य कारंजे उभारले जाणार आहे.

श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार
अयोध्या: उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. या मंदिरामुळे शहराची शोभा वाढली आहे. पण, आता यात आणखी एक भर पडणार आहे. योगी सरकारने राम मंदिर परिसराजवळ 100 कोटी रुपयांचा मेगा 'मल्टीमीडिया शो फाउंटन' बांधण्याची भव्य योजना आखली आहे. अंदाजे 25,000 लोक एका वेळी अॅम्फीथिएटर शैलीतील आसन व्यवस्थेमध्ये हे मोठे कारंजे पाहू शकतील.
मीडिया रिपोर्टनुसार, गुप्तार घाट ते नया घाटापर्यंत, 20 एकर जागेत कमळाच्या आकाराचा कारंज बांधण्याची योजना आहे. या कारंजात 50 मीटरपर्यंत पाणी वर हवेत उडेल. हे कारंजे दिव्य आणि आध्यात्मिक अनुभव देण्यासाठी बांधले जाईल, जे श्री राम मंदिराची भव्यता आणखी वाढवेल. हे भगवान रामाची महाकथा सांगण्यासाठीचे ठिकाण म्हणून काम करेल. याद्वारे यात्रेकरू आणि पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव मिळेल.
या कारंज्याचा उद्देश राम मंदिर परिसराचे सौंदर्य वाढवणे हा आहे. कारंजाची रचना भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या रूपासारखी असेल. कारंज्याच्या रचनेत कमळाचा समावेश केल्याने भारताची ओळख आणि वारसा यांच्याशी एक मजबूत आणि हृदयस्पर्शी संबंध निर्माण होतो. कारंज्याच्या रचनेत हिंदू धर्माच्या सात पवित्र नद्यांचे प्रतीक म्हणून कमळाने प्रेरित सात पाकळ्यांचा समावेश आहे.
सात पाकळ्या भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या रामाचे प्रतीक आहेत. कारंजे पर्यटकांना वेगळा अनुभव देण्यासाठी डिझाइन केले जाईल. दिवसा कारंजे एका धबधब्यासारखे दिसेल, तर सायंकाळनंतर खास वॉटर शोद्वारे प्रेक्षकांना रामायणाची कथा दाखवली जाईळ.