शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

...अन् वाघोबा बनला निवडणुकीचा मुद्दा; पाच वर्षांत २२ हून अधिक गावकरी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 06:10 IST

पिलीभीतमध्ये केली पाच वर्षांत २२ हून अधिक गावकऱ्यांची शिकार

पिलीभीत (उत्तर प्रदेश) : राजकीय नेते निवडणूक प्रचारसभांमध्ये विकास, आधुनिकीकरण आणि प्रगतीची आश्वासने देत असोत, पिलीभीत लोकसभा मतदारसंघातील सुमारे ३०० गावांतील नागरिकांचा अजूनही मानवजातीचा सर्वांत आदिम संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष म्हणजे माणूस आणि वन्यप्राणी संघर्ष.

बेंगाल टायगरचा (पॅन्थेरा टायग्रिस) अधिवास असलेल्या लगतच्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्पातील वाघांशी ग्रामस्थांचा संघर्ष नित्याचाच आहे. कधी कधी या चकमकी जीवघेण्याही ठरतात. अधिकृत नोंदीनुसार, नोव्हेंबर २०१९ पासून या गावांतील २२ हून अधिक लोकांना वाघांनी ठार मारले आहे. नुकतेच ९ एप्रिलला भाजप उमेदवार जितीन प्रसाद यांच्या समर्थनार्थ पुरणपूर भागात राजकीय प्रचारसभा होण्याच्या काही तास आधी ५५ वर्षीय शेतकरी भोले राम यांना वाघाने जखमी केले. गेल्या सहा महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात भोले रामसह चारजणांचा या गावात मृत्यू झाला आहे. 

नेत्यांची आश्वासने सुरू- पिलीभीतमध्ये या मृत्यूमुळे मनुष्य-प्राणी संघर्ष हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. - वाघांमुळे कायमच अस्तित्व धोक्यात आलेल्या गावकऱ्यांकडून वाघांना जंगलाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. - राजकीय पक्षांनाही याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि आश्वासने सुरू झाली आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Tigerवाघ