‘योगी आदित्यनाथ घुसखोर; त्यांना उत्तराखंडला पाठवा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:55 IST2025-10-13T12:54:55+5:302025-10-13T12:55:29+5:30
भाजपकडे खोटे आकडे आहेत. त्यांच्या आकड्यावर विश्वास ठेवला तर मानसाची दिशाभूल होईल, असा दावा रविवारी अखिलेश यांनी केला.

‘योगी आदित्यनाथ घुसखोर; त्यांना उत्तराखंडला पाठवा’
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे घुसखोर असून, त्यांना उत्तराखंड राज्यात पाठवले पाहिजे, असे आवाहन करत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी घुसखोरीच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या भाजपला लक्ष्य केले. भाजपकडे खोटे आकडे आहेत. त्यांच्या आकड्यावर विश्वास ठेवला तर मानसाची दिशाभूल होईल, असा दावा रविवारी अखिलेश यांनी केला.
जे लोक पलायन करणाऱ्यांची आकडेवारी देत आहेत, त्यांनी स्वत: उत्तर प्रदेशात घुसखोरी केली आहे. मुख्यमंत्री योगी उत्तराखंडचे आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची आमची इच्छा आहे. ते एकटेच घुसखोर नाहीत. ते वैचारिक दृष्टिकोनातूनदेखील घुसखोर असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. योगी हे भाजपचे सदस्य नव्हते. ते दुसऱ्याच पक्षाचे सदस्य होते, असे नमूद करत या घुसखोरांना कधी हटवणार, असा सवाल अखिलेश यांनी उपस्थित केला.
मागासवर्गीयांवरील अत्याचार वाढले भाजप सरकारच्या काळात मागासवर्गीयांवर होणाऱ्या अत्याचारात मोठी वाढ झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो(एनसीआरबी)च्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
मागासवर्गीयांवर उत्तर प्रदेश राज्यातच सर्वाधिक अत्याचार या भाजप सरकारच्या काळात झाला आहे. एनसीआरबीचे आकडा हा भाजप सरकारची आकडेवारी असल्याचा दावा अखिलेश यांनी केला.