"मी प्रेमात उद्धवस्त झालोय...", २ पानी सुसाईट नोट लिहून एम्सच्या डॉक्टरने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 12:46 PM2023-07-07T12:46:21+5:302023-07-07T12:46:42+5:30

मृत डॉक्टरच्या वडिलांनी मुलाची प्रेयसी आणि तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 AIIMS hospital doctor Subhash ends his life after being harassed by his girlfriend in Uttar Pradesh's Prayagraj | "मी प्रेमात उद्धवस्त झालोय...", २ पानी सुसाईट नोट लिहून एम्सच्या डॉक्टरने संपवलं जीवन

"मी प्रेमात उद्धवस्त झालोय...", २ पानी सुसाईट नोट लिहून एम्सच्या डॉक्टरने संपवलं जीवन

googlenewsNext

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एम्सच्या एका डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मृतदेहाच्या बाजूला दोन पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यात आत्महत्येचे कारण सांगण्यात आले आहे. सुसाईट नोटमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रेयसीमुळे संबंधित डॉक्टरने जीवन संपवले. आता मृत डॉक्टरच्या वडिलांनी मुलाची प्रेयसी आणि तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
प्रयागराजमधील अल्लापूरमधील ही घटना असल्याचे समजते. इथे रायबरेली एम्स रूग्णालयामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर सुभाष भाड्याच्या खोलीत राहत असत. त्यांनी कन्नौज मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर ते रायबरेली एम्समध्ये प्रशिक्षण घेत होते. गुरुवारी सकाळी त्यांनी फोन उचलला नाही आणि घराचा दरवाजा बंद होता म्हणून शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

प्रेयसीमुळे केली आत्महत्या 
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खोलीचा दरवाजा तोडला. जिथे खोलीत डॉ. सुभाष यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. खोलीची झडती घेतली असता पोलिसांना दोन पानी सुसाईड नोट सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर, कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
 
सुसाईट नोट लिहून संपवलं जीवन 
आत्महत्या करण्यापूर्वी सुभाष यांनी लिहलेल्या सुसाईट नोटमध्ये म्हटले, "मी प्रेमात उद्धवस्त झालो असून माझ्या मृत्यूला माझी प्रेयसी आणि तिचा भाऊ जबाबदार आहे. ९ लाख रुपये देऊन प्रेयसी चंद्रप्रभाला हॉस्पिटलमध्ये नर्स बनवण्यात आले. आता ती मला ब्लॅकमेल करत आहे. माझे लग्न ठरले तर ती मोडत आहे. तिच्या भावाने मला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. ते सांगत आहेत की, तुला ना जगू देणार, ना मरू देणार, असंच त्रास सहन करत राहावं लागेल."

  

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title:  AIIMS hospital doctor Subhash ends his life after being harassed by his girlfriend in Uttar Pradesh's Prayagraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.