भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:19 IST2024-05-08T15:31:22+5:302024-05-08T16:19:02+5:30
Uttar Pradesh Viral Video: सोशल मीडियावर दररोज कुठले ना कुठले व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या या व्हिडीओमध्ये एक महिल्या मद्याच्या नशेमध्ये धुंद होऊन भर चौकात गोंधळ घालताना दिसत आहे.

भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...
सोशल मीडियावर दररोज कुठले ना कुठले व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या या व्हिडीओमध्ये एक महिल्या मद्याच्या नशेमध्ये धुंद होऊन भर चौकात गोंधळ घालताना दिसत आहे. यादरम्यान, तिथे लोकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसत आहे. ही महिला तिथे आलेल्या पोलिसांसोबतही वाद घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
मद्याच्या नशेत धुंद झालेली ही महिला भरचौकामध्ये पोलिसांसोबत वाद घालू लागली. त्यानंतर ही महिला रस्त्यावरून इकडे तिकडे फिरू लागली. तसेच तिने स्व:तच्या अंगावरील कपडेही फाडण्यास सुरुवात केली.
ही घटना कानपूरमध्ये सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडलीय येथील गुमटी चौकात एक महिला मद्याच्या नशेत गोंधळ घालताना दिसली. ती पोलीस चौकीसमोर असलेल्या मार्केटमध्ये केस मोकळे सोडून इकडे तिकडे फिरू लागली. यादरम्यान तिथे लोकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. काही जणांनी व्हिडीओ चित्रित करण्यास सुरुवात केली. तसेच जमावाला पाहून पोलीसही तिथे दाखल झाले.
पोलिसांनी या महिलेची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने उलट पोलिसांशीच वाद घातलाय तसेच त्यांना धक्काबुक्की केली. सुमारे अर्धा तास हे नाट्य रंगल्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन महिला आश्रय केंद्रामध्ये पाठवले. आता या महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. तसेच ती शुद्धीत आल्यावर तिची चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.