लखनऊ/गोरखपुर - महागड्या होटेल्समध्ये लग्ना कार्यासारख्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा खर्च उचलू न शकणाऱ्या, उत्तर प्रदेशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी, मोठा दिलासा दिला आहे. यामुळे आता सामान्य कुटुंबांना लग्नासाठी महागडे हॉल अथवा बँक्वेट हॉल बुक करण्याची गरज पडणार नाही. कारण आता, सरकारने "मुख्यमंत्री नगर सृजन योजने" अंतर्गत राज्यातील नव्याने निर्माण झालेल्या आणि सीमावर्ती शहरी भागांत 'कल्याण मंडपम्' बांधण्याचा एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे.
महत्वाचे म्हणजे, आतापर्यंत राज्यातील ६६ कल्याण मंडपम प्रकल्पांसाठी २६० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार, यापैकी विक्रमी ३९ कल्याण मंजपम् पूर्ण झाले असून २७ बांधकामे सुरू आहे, जे लवकरच जनतेला समर्पित केले जातील.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी गोरखपूरमधील मानबेला आणि राप्तीनगर येथे बाधण्यात आलेल्या 'कल्याण मंडपम्'चे लोकार्पण केले. मुख्यमंत्री योगी यांनी त्यांच्या आमदार निधीतून यांच्या बांधकामासाठी निधी दिला आहे. महत्वाचे म्हणजे, बुकिंग प्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी एक विशेष ऑनलाइन बुकिंग पोर्टल देखील विकसित करण्यात आले आहे, जेणेकरून लोक या सामुदायिक केंद्रांना सहजपणे बुक करू शकतील.
आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मोठा दिलासा -कल्याण मंडपममध्ये लग्न आणि इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी हॉल, स्वयंपाकघर, कपडे बदलण्याची खोली आणि शौचालये अशा सर्व आवश्यक सुविधा बांधण्यात आल्या आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वस्त आणि सन्मानजनक सुविधा प्रदान करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.
शुल्कात अत्यंत कमी -सरकारने या कल्याण मंडपांचे शुल्क देखील अत्यंत कमी ठेवले आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी शुल्क केवळ ११,००० रुपये एवढे असेल. अनेक शहरांमध्ये, कल्याण मंडपम् सारख्या सुविधेसाठी लोकांना ५० हजार ते एक लाख रुपये खर्च करावे लागतात. महत्वाचे म्हणजे बुकिंगसाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' असेल.
या ठिकाणी बांधण्यात आले आहेत कल्याण मंडपम -आतापर्यंत, अलीगढ (मद्रक), आंबेडकरनगर (राजे सुलतानपूर, जहांगीरगंज), अमरोहा, अयोध्या (शहर आणि मां कामाख्या), आझमगढ (जहागंज बाजार), बस्ती (कप्तानगंज), फर्रुखाबाद (नवाबगंज), फतेहपूर (असोधार), फिरोजाबाद (मक्खनपूर) गोरखपूर (शहर), कानपूर देहात (कंपेसी, रनिया), कौशाम्बी (दारानगर), लखनौ (शहर तथा बंथरा), महाराजगंज (बृजमानगंज), मऊ (मऊनाथ भंजन), पीलीभीत ( नौगवां), प्रतापगढ़ (रामगंज), सोनभद्र (ओब्रा, अनपरा), सुल्तानपूर (लंभुआ), उन्नाव (अचलगंज) आदी प्रमुख ठिकाणिया ठिकाणी सुरू आहेत कामे -या शिवाय राज्यात, आग्रा (शहर), अलीगढ (शहर आणि जावा सिकंदरपूर), भदोही, बहराइच (शहर, कैसरगंज, रुपैडिहा), बलिया (रात्सर कलां), बाराबंकी (नवाबगंज, रामसनेही घाट), बस्ती (गणेशपूर), बिजनौर, बुलंदशहर (अनुपशहर), चित्रकूट (चित्रकूट धाम), देवरिया, एटाह (मिरहाची), गोरखपूर (कॅम्पियरगंज), हाथरस, जालौन, जौनपूर (गोरा बादशाहपूर), कौशांबी (मांझनपूर, चरवा), पडरौना, लखीमपूर खेरी (निघासन), मथुरा, प्रतापगढ (बेल्हा प्रतापगढ, कोहदौर), प्रयागराज, रामपूर (दडियाल, सैफनी), संत कबीर नगर (खलीलाबाद, बखिरा) शाहजहांपूर, सिद्धार्थ नगर (नगर, बडनी चाफा व कपिलवस्तू), सोनभद्र (शहर), वाराणसी (शहर) आदी प्रमुख ठिकाणी 'कल्याण मंडपम्'ची कामे सुरू आहेत.