अयोध्येत दीपोत्सवात राम की पैडी येथे  ८०,००० दिव्यांच्या रांगोळीचा लखलखाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 09:22 IST2025-10-18T09:21:35+5:302025-10-18T09:22:09+5:30

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार, या वर्षीचा नववा दीपोत्सव-२०२५ अयोध्येला नवीन सांस्कृतिक उंचीवर घेऊन जाईल. श्रीरामनगरी केवळ लाखो दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघणार नाही, तर उत्तर प्रदेशच्या लोककला, परंपरा आणि अध्यात्माचा एक अनोखा संगमदेखील सादर करणार आहे.

A rangoli of 80,000 lamps sparkles at Ram Ki Paidi during Deepotsav in Ayodhya | अयोध्येत दीपोत्सवात राम की पैडी येथे  ८०,००० दिव्यांच्या रांगोळीचा लखलखाट

अयोध्येत दीपोत्सवात राम की पैडी येथे  ८०,००० दिव्यांच्या रांगोळीचा लखलखाट


अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येतील दीपोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, राम की पैडी येथे ८०,००० दिव्यांनी सजवलेली रांगोळी साकारली जाणार आहे. दरम्यान, अयोध्या धामला अधिक भव्य स्वरूप देण्यासाठी २० विशेष सेल्फी पॉइंट्स तयार केले जात आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार, या वर्षीचा नववा दीपोत्सव-२०२५ अयोध्येला नवीन सांस्कृतिक उंचीवर घेऊन जाईल. श्रीरामनगरी केवळ लाखो दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघणार नाही, तर उत्तर प्रदेशच्या लोककला, परंपरा आणि अध्यात्माचा एक अनोखा संगमदेखील सादर करणार आहे. या वर्षी, राम की पैडी येथील देखावा अद्वितीय असेल. यामध्ये ८०,००० दिव्यांनी सजवलेली रांगोळी असेल. अयोध्येतील दीपोत्सवाच्या इतिहासात प्रथमच, राम की पैडी येथे इतकी मोठी रांगोळी तयार केली जात आहे.

 सेल्फी पॉइंट्सचे वैशिष्ट्य
अयोध्या धामला अधिक भव्य स्वरूप देण्यासाठी २० विशेष सेल्फी पॉइंट्स तयार केले जात आहेत. 

हे सेल्फी पॉइंट्स रामायणातील विविध अध्यायांवर आधारित असतील. धर्मपथ, लता मंगेशकर चौक, राम की पैडी आणि रामकथा पार्क यांसारख्या प्रमुख ठिकाणी स्थापित केले जातील.

प्रत्येक सेल्फी यामध्ये हनुमानजी सुमेरु पर्वतासह उड्डाण करत आहेत, भगवान श्रीरामांना पावसापासून वाचवण्यासाठी केळीच्या पानाखाली उभे आहेत, हनुमान श्रीराम, लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन उड्डाण करत आहेत अशी भावनिक व प्रेरणादायी दृश्ये यात समाविष्ट आहेत.

Web Title : अयोध्या दीपोत्सव: राम की पैड़ी पर 80,000 दीपों की रंगोली

Web Summary : अयोध्या में दीपोत्सव की तैयारी ज़ोरों पर है, राम की पैड़ी पर 80,000 दीपों की रंगोली बनाई जाएगी। उत्तर प्रदेश की संस्कृति को दर्शाते बीस विशेष रामायण-थीम वाले सेल्फी पॉइंट बनाए जा रहे हैं।

Web Title : Ayodhya Deepotsav: 80,000 Lamps Illuminate Ram Ki Paidi Rangoli

Web Summary : Ayodhya prepares for Deepotsav with a grand 80,000-lamp rangoli at Ram Ki Paidi. Twenty special Ramayana-themed selfie points are being created to enhance the festive experience, showcasing Uttar Pradesh's culture and spirituality.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.