११० किमी वेगाने जात असलेल्या ट्रेनमधून प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला, फरफटत गेला, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 03:40 PM2023-06-21T15:40:13+5:302023-06-21T15:40:36+5:30

Indian Railway: उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथून एक अजब व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात धावत्या ट्रेनमधून एक तरुण खाली पडताना दिसत आहे. एवढंच नाही तर तो प्लॅटफॉर्मवर पडून फरफटत गेला.

A passenger fell on the platform from a train traveling at a speed of 110 kmph, sputtered, then... | ११० किमी वेगाने जात असलेल्या ट्रेनमधून प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला, फरफटत गेला, त्यानंतर...

११० किमी वेगाने जात असलेल्या ट्रेनमधून प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला, फरफटत गेला, त्यानंतर...

googlenewsNext

उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथून एक अजब व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात धावत्या ट्रेनमधून एक तरुण खाली पडताना दिसत आहे. एवढंच नाही तर तो प्लॅटफॉर्मवर पडून फरफटत गेला. मात्र नंतर तो तरुण उठून आपले कपडे झाडत निघून गेला. त्यामुळे पाहणार अवाक झाले. पडलेला तरुण कोण होता, कुठून आला होता आणि त्याला कुठे जायचं होतं हे समजू शकलेलं नाही.

व्हायरल व्हिडीओ शाहजहांपूर रेल्वे स्टेशनवरील आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांची गर्दी होती. त्याचवेळी रुळांवरून पाटलीपुत्र एक्स्प्रेस तिथून वेगाने गेली. त्या ट्रेनचा वेग ११० किमी प्रतितास एवढा होता. तेवढ्यात ट्रेनमधून एक तरुण अचानक प्लॅटफॉर्मवर येऊन पडला.

त्यानंतर जवळपास १०० मीटरपर्यंत फरफटत गेला. स्टेशनवर कुणीतरी ट्रेनचा व्हिडीओ बनवत होता. त्याच्या मोबाईलमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली. तसेच तिथूनच हा व्हिडीओ व्हायरल झाला. सुदैवाने या व्यक्तीला खूप दुखापत झाली नाही. तो स्वत:च उठला आणि कपडे झाडत तिथून निघून गेला.

आता हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एवढ्या भरधाव ट्रेनमधून खाली पडल्यानंतरही या व्यक्तीला फारशी दुखापत कशी काय झाली नाही, असा प्रश्न या लोकांना पडला आहे. आता हा व्हिडीओ पाहून लोकांच्या तोंडावर एकच वाकप्रचार येत आहे. तो म्हणजे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.  

Web Title: A passenger fell on the platform from a train traveling at a speed of 110 kmph, sputtered, then...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.