लखनौमध्ये दिसणार ‘महाकुंभ’सारखं दृश्य, १९ व्या राष्ट्रीय मेळाव्याच्या तयारीला वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:22 IST2025-09-28T15:22:31+5:302025-09-28T15:22:49+5:30
Uttar Pradesh News: लखनौमधील डिफेन्स एक्स्पो ग्राऊंडमध्ये नोव्हेंबर महिन्यात भारतीय स्काऊट गाईडच्यावतीने १९ व्या राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन होणार आहे. त्यासाठीच्या तयारीला वेग आला असून, या मेळाव्यासाठी या मैदानावर एक भव्य असे तात्पुरते शहर उभारले जाणार आहे.

लखनौमध्ये दिसणार ‘महाकुंभ’सारखं दृश्य, १९ व्या राष्ट्रीय मेळाव्याच्या तयारीला वेग
लखनौमधील डिफेन्स एक्स्पो ग्राऊंडमध्ये नोव्हेंबर महिन्यात भारतीय स्काऊट गाईडच्यावतीने १९ व्या राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन होणार आहे. त्यासाठीच्या तयारीला वेग आला असून, या मेळाव्यासाठी या मैदानावर एक भव्य असे तात्पुरते शहर उभारले जाणार आहे. उभारण्यात येत असलेली ही टेंट सिटी भारतीय स्काऊट गाईडच्यावतीने १९ व्या राष्ट्रीय मेळाव्याचे यजमानपद भूषवणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या यजमानपदाखाली आयोजित होत असलेल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे ३२ हजार विद्यार्थी आणि ३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी उत्तम दर्जाच्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कामाचं भूमिपूजन २९ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील वरिष्ठ मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
यादरम्यान येथील डिफेन्स एक्स्पपो ग्राऊंड हे हल्लीच संपन्न झालेल्या महाकुंभा मधील टेंटसिटीसारखं दिसणार आहे. येथे राष्ट्रीय मेळाव्यासाठी ३५०० हून अधिक टेंट लावण्यात येणार आहेत. प्रत्येक सहभागी दलाला वेगवेगळी निवासाची व्यवस्था असेल. तसेच या ठिकाणी स्वच्छता आणि भोजनावर विशेष लक्ष पुरवलं जाणार आहे. त्यासाठी ६४ स्वयंपाकघरं बांधण्यात येणार आहेत. त्यामधून सहभागी झालेल्या हजारो लोकांसाठी भोजन उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या सूचनेनुसार या मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाणार आहे. येथे १०० खाटांचं एक रुग्णालय, १५ डिस्पेंसरी आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याबरोबरच २४ बाय ७ कार्यरत असणारा कंट्रोल रूम आणि हेल्पलाईनची व्यवस्थाही केली जाणार आहे. या मेळाव्यामधून ग्रीन एनर्जी आणि प्लॅस्टिक मुक्त परिसराचं मॉडेल प्रस्तूत केलं जावं, अशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची इच्छा आहे. त्यासाठी जल संरक्षण, स्वच्छता आणि कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी विशेष पथकं तैनात केली जाणार आहेत. त्याबरोबरच वॉटर एटीएम, स्वच्छ शौचालय आणि स्नानगृह उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
याशिवाय या मेळाव्याच्या ठिकाणी वायफाय झोन, प्रदर्शन हॉल, मीटिंग हॉल आमि ग्लोबल व्हिलेजसुद्धा उभारलं जाणार आहे. १०० दुकानं असलेल्या मेळावा मार्केटमध्ये तरुणांना दैनंदिन वापराच्या वस्तू उपलब्ध होतील. एकूणच या सर्व व्यवस्थेमधून कार्यक्रमाच्या आजोजनातील भव्यताच नाही तर उत्तर प्रदेश हा आता जागतिक स्तरावरील कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिलं जाणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकाराने मेळाव्याच्या ठिकाणाला गेटेट टेंट सिटीच्या रूपात विकसित केलं जाणार आहे. तसेच या मेळाव्याच्या आयोजनामुळे उत्तर प्रदेशच्या प्रतिष्ठेत वाढ होण्याबरोबरच जी-२० आणि महाकुंभसारख्या मोठ्या मेळाव्यांच्या माध्यमातून राज्याची जागतिक ओळख आदर्श रूपात स्थापित होणार आहे.