घरात प्रेमपत्र सापडले अन् त्याचा संयम तुटला; पत्नीचं शीर घेऊन पोलिसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 07:48 IST2024-02-17T07:48:07+5:302024-02-17T07:48:31+5:30

शुक्रवारी सकाळी घरात त्याला एक प्रेमपत्र सापडले.

A love letter is found in the house and his temper breaks; To the police with his wife's head | घरात प्रेमपत्र सापडले अन् त्याचा संयम तुटला; पत्नीचं शीर घेऊन पोलिसात

घरात प्रेमपत्र सापडले अन् त्याचा संयम तुटला; पत्नीचं शीर घेऊन पोलिसात

बाराबंकी : उत्तर प्रदेशमधील लखनौला लागून असलेल्या बाराबंकीमध्ये पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केली. यानंतर पती हातात कापलेले डोके घेऊन पोलिस ठाण्यात जात होता. पोलिसांनी त्याला वाटेत पकडले. मी पत्नीची हत्या केली असून, मला अटक करा, असे त्याने पोलिसांना सांगितले. 

अनिल असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी घरात त्याला एक प्रेमपत्र सापडले. यानंतर त्याचा संयम सुटला. त्याने थेट पत्नीचे शीरच कापले. शेजाऱ्यांनी सांगितले की, आरोपीला संशय होता की, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. स्थानिकांनी सांगितले की, दोघांचे लग्न ८ वर्षांपूर्वी झाले होते. आपल्या पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर असल्याचा अनिलला संशय होता.

Web Title: A love letter is found in the house and his temper breaks; To the police with his wife's head