Stoped the state highway for banner by BJP-Sena workers | भाजप-सेना कार्यकर्त्यांचा बॅनरसाठी रास्ता रोको

भाजप-सेना कार्यकर्त्यांचा बॅनरसाठी रास्ता रोको

उस्मानाबाद : तालुक्यातील कसबे तडवळा येथील एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याच्या श्रद्धांजलीचे बॅनर काढावे या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला. 


येथील शेतकरी दिलीप ढवळे यांनी 12 एप्रिल रोजी सेना उमेदवाराचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली होती. त्यानंतर आज मतदानाच्या दिवशी गावात त्यांच्या श्रध्दांजलीचे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर मतदानावर प्रभाव पाडत असल्याचा दावा करीत तातडीने ते हटवावेत या मागणीसाठी सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली लातूर-बार्शी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. 9.35 वाजता सुरू झालेल्या आंदोलनास प्रशासनातील अधिकाऱ्यांनी 9.50 वाजता भेट दिली. त्यांनी बॅनर काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर 10 वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.
 

Web Title: Stoped the state highway for banner by BJP-Sena workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.