धक्कादायक ! दुचाकीस्वारांना उडवलेल्या कारमध्ये आढळली दोन पिस्तुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 01:33 PM2021-10-09T13:33:31+5:302021-10-09T13:47:47+5:30

Crime News In Usmanbad : या घटनेत दुचाकीवरील हे दोघेही जखमी झाले. तर, कार बाजूला आदळली.

Shocking! Two pistols were found in a car blown up by two-wheelers | धक्कादायक ! दुचाकीस्वारांना उडवलेल्या कारमध्ये आढळली दोन पिस्तुले

धक्कादायक ! दुचाकीस्वारांना उडवलेल्या कारमध्ये आढळली दोन पिस्तुले

Next
ठळक मुद्देराँग साइड कारने दुचाकीस्वारांना उडवलेनागरिकांनी कारमधील एकाला पकडले

उस्मानाबाद : येथून औसेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अपघातग्रस्त कारमध्ये दोन पिस्तुले सापडल्याची ( Two pistols were found in a car) घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलिसांनी कारमधील एकास ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

लातूर जिल्ह्यातील औसा येथील प्रवीण कठारे, नरेश तौर व कन्हेरी येथील पंकज झिरमिरे हे तिघे एमएच ०६ बीएम ४८३३ या क्रमांकाच्या कारमधून पैशांच्या व्यवहारासाठी पुणे येथे गेले होते. तेथून परतताना बार्शी येथे त्यांनी मद्यपान केले. त्याच अवस्थेत उस्मानाबादहून शिवलीमार्गे औसा येथे जात असताना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास या कारने राँग साइड जाऊन वसंत श्रीरंग जाधव व खंडू पांडुरंग कुंभार यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील हे दोघेही जखमी झाले. तर, कार बाजूला आदळली.

ही घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधील प्रवीण कठारे याला पकडले. मात्र, चालक नरेश तौर व पंकज झिरमिरे हे पळून गेले. हा प्रकार बेंबळी ठाण्याचे सहायक निरीक्षक शेंडगे यांना समजताच त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, नागरिकांनी पकडून ठेवलेल्या कठारे याला ताब्यात घेऊन पंचनामा सुरू केला होता. त्या वेळी कारमध्ये देशी बनावटीची दोन पिस्तुले आढळली. पोलिसांनी ती ताब्यात घेऊन तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत फरार झालेल्या आरोपींचा शोध बेंबळी पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचा - आंध्रप्रदेशातून औरंगाबाद रेल्वेस्थानकात आला ३९ किलो गांजा; विशाखापट्टणमचे तिघे अटकेत

Web Title: Shocking! Two pistols were found in a car blown up by two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app