दूध उत्पादक पाठवणार अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 02:35 AM2020-08-13T02:35:26+5:302020-08-13T06:49:00+5:30

भाजपचे प्रदेश सटचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हे दूध आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

milk producers to write letter to cm uddhav thackeray demanding grant | दूध उत्पादक पाठवणार अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

दूध उत्पादक पाठवणार अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

googlenewsNext

उस्मानाबाद : राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप महायुतीच्या वतीने १ आॅगस्ट रोजी राज्यभरात महादूध एल्गार आंदोलन करण्यात आले; परंतु न्याय मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील पाच लाख दूध उत्पादक शेतकरी मुख्यमंत्र्यांना पत्ररूपी निवेदन पाठवून आपल्या भावना कळविणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिली.

भाजपचे प्रदेश सटचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हे दूध आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. १३ ते १९ आॅगस्ट या दरम्यान हे आंदोलन केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे गायीच्या दुधाला ३० रूपये दर, दुधाला प्रतिलिटर १० रूपये अनुदान व दूध भुकटीला ५० रूपये अनुदान द्यावे, अशी मागणी या पत्ररूपी निवेदनात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: milk producers to write letter to cm uddhav thackeray demanding grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.