बघा ! हे असंही घडतंय, शेतकऱ्यानं 2 एकर 'कांदा' पिकात फिरवला रोटाव्हेटर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 06:25 PM2019-12-08T18:25:33+5:302019-12-08T18:28:00+5:30

कांदा पिकांच्या संदर्भात केवळ काळ्या आईची ओटी भरणं अन् वाढीसाठी

This also happens to be, a 2 acre onion crop rotavator by farmer in kalamb | बघा ! हे असंही घडतंय, शेतकऱ्यानं 2 एकर 'कांदा' पिकात फिरवला रोटाव्हेटर

बघा ! हे असंही घडतंय, शेतकऱ्यानं 2 एकर 'कांदा' पिकात फिरवला रोटाव्हेटर

googlenewsNext

बालाजी अडसूळ 

एकीकडे कांद्याला मिळणाऱ्या उचांकी दराच्या कथा मांडल्या जात असतांनाच दुसरीकडे मात्र परतीच्या पावसाने वाया गेलेल्या कांदा फडावर 'नांगर' फिरवण्याची दुर्देवी वेळ काही कांदा उत्पादक शेतकर्यावर आली आहे.अशीच डोळ्यात पाणी आणणारी वेळ इटकूर येथील बापूराव आडसूळ यांच्यावर ओढवली असून दरवृद्धी चर्चेचा 'हिशोब' तेजीत असतांनाच आपल्या दोन एकर कांदा क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवले आहे.

कांदा पिकांच्या संदर्भात केवळ काळ्या आईची ओटी भरणं अन् वाढीसाठी राब राब राबणं शेतकर्यांच्या हातात आहे. बाकी, त्यांला मिळणारी हवामान अन् पाऊसपाण्याची साथ, बाजारातील दर हे सारं काही परस्वाधीन आहे.

यामुळेच हा कांदा, कधी उत्पादकांना रडवतो तर कधी त्यांच्या चेहर्यावर हास्य निर्माण करतो असा आजवरचा अनुभव आहे.इटकूर (ता कळंब )येथील बापूराव तुकाराम आडसूळ यांनी खरीप हंगामात दोन एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली होती.चागंली मेहनत व मशागत करूण पिक जोपासले होते.परंतु, पावसाळ्याच्या पुर्वार्धात टंचाईच्या झळा मागे लागल्या होत्या.

यावर चाळीस पाईप अंथरून शेजारच्या शेतकर्याचे पाणी आणले अन् कांदा पिक वाचवले.मात्र ऐन मोक्याच्यावेळी कांदा क्षेत्राला परतीच्या अवकाळी पावसाने गाठले. यामुळे कांदा अन् त्याची मूळ मातीमध्येच नासले.वाढ खुंटली, पाती जळाल्या.बघता बघता संपुर्ण प्लॉट हातचा गेला.

 उभ्या पिकांवर फिरवला नांगर.... 

अवेळी आलेल्या पावसाने व यात जवळपास एक महिना सातत्य राहिल्याने बापूरावांच्या कांदा पिकाचे आतोनात नुकसान झाले होते.यामुळे काढणीस लावलेल्या मजूराचा खर्च ही निघाला नसता.बाजार दाखवण्या इतपतही माल निघण्याची शक्यता धुसर झाली होती.यामुळे अखेर त्यांनी आपल्या दोन एकर कांदा क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवून पिक मोडले आहे. 

लाखाचे बारा हजार ही नाहीत... 
सद्या कांदा दरवृद्धीच्या कथा शेतकर्यासांठी किती सुखद आहेत असे चीत्र दर्शवले जात असतांना बापूरावांचे मात्र लाखांचे बारा हजार ही झाले नसल्याचे दिसून येत आहे.त्यांनी २५ टन उत्पन्न व २० हजार रूपये टन असा दर गृहीत धरला होता.यानुसार चार ते पाच लाख उत्पन्न अपेक्षीत होते. मात्र, सद्या कांद्याला टनाला तर सोडा क्विंटलला वीस हजाराचा दर मिळाला आहे. मात्र, बापूरावांनी विकायचं काय ?. एकूणच, हे उदाहरण प्रातिनिधिक असले तरी शशिकांत गंभिरे, शिवाजी आडसूळ अशा अनेक कांदा शेतकर्यांचे 'लखपती' व्हायचं स्वप्न परतीच्या पावसाने धुळीस मिळवले आहे. 

विम्याचे कवच नाही, खरीप मदत तरी.... 
कांदा हातचा गेला असतांना दुसरीकडे सदर पिकांचा खरीप हंगाम कृषि विमा योजनेच्या अधिसूचित पिकांत समावेश नसल्याने कांद्याचा विमा भरता आलेला नाही.यामुळे बाधीत क्षेत्रासाठी शेतकर्यांना विमा नुकसान भरपाईचे कवच मिळणार नाही. यामुळे किमान शासनाच्या खरीप मदत वाटपात कांदा पिकांची फळपीकात नोंद घेवून वाढीव मदत द्यावी अशी मागणी बापूराव आडसूळ यांनी केली आहे. 

Web Title: This also happens to be, a 2 acre onion crop rotavator by farmer in kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.