शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मोठ्या भावाला साधा चहासुध्दा करता येत नाही, हे बरोबर आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 07:30 IST

मुलग्यांना घरकाम का नाही?

ठळक मुद्देआईला सांग भावालाही घरकाम शिकवायला.

मुलींना घरातली कामं करता येतात. मुलग्यांना मात्र येत नाहीत. माझा भाऊ आठवीत आहे, पण त्याला चहा सुद्धा करता येत नाही. असं का?- सायली, जळगाव

अतिशय महत्वाचा आणि अतिशय अवघड प्रश्न विचारला आहेस. तुला ज्या अर्थी हा प्रश्न पडतोय त्याअर्थी आता जे सांगणार आहे ते तू समजून घेऊ शकशील. आपला समजा स्त्री पुरुष समानता न मानणारा आहे. म्हणजे, स्त्री आणि पुरुषांना समान वागणूक देणारा, समान हक्क देणारा नाही.  आणि ही असमानता घरातून सुरु होते. मुलींसाठी गुलाबी रंग, मुलांसाठी निळा रंग इथपासून सुरु होते. त्यात स्वयंपाकघर हे फक्त बायकांचंच क्षेत्र मानल्यामुळे आणखीनच गोंधळ वाढला आहे. पूर्वी म्हणजे साठ सत्तर वर्षांपूर्वी पयर्ंत बायका आजच्या इतक्या बाहेर काम करायला जात नसतं. त्यांनी घरकाम करावं अशीच सगळ्यांची अपेक्षा असायची. त्यामुळे मुलींना सगळं यायला हवं असं मानून स्वयंपाक आणि घरकाम शिकवलं जायचं. मुलांनी हे करायचं नाही हे गृहीत असल्याने मुलांना घरकामातलं काहीच शिकवलं जायचं नाही. 

पण काळ बदलला तसं बायका घराबाहेर पडल्या. नोक?्या करू लागल्या. उच्च पदांवर काम करू लागल्या. पण त्या जशा घराबाहेर पडल्या तसे घरातल्या पुरुषांनी मात्र घरकामात लक्ष घातलं नाही. तशी त्यांच्याकडून स्त्रियांनीही अपेक्षा केली नाही. त्यामुळे समाजाचं चित्र बदललं तरी घरकामात पुरुषांचा सहभाग वाढला नाही. आजही अनेक घरांतून मुलग्यांनी घरकाम करायचं नाही असं मानलं जातं त्यामुळे त्यांना चहा करणं, कुकर लावणं, केर काढणं, भांडी धुणं या अगदी बारीक सारीक घरकामाचा गोष्टी येत नाहीत. पण हे चित्र आता बदलायला हवं. तू याची सुरुवात करू शकतेस. आईला सांग भावालाही घरकाम शिकवायला. कदाचित ती सुरुवातीला नाही म्हणोल, रागवेल पण प्रेमाने दोनचारदा सांगितलंस तर ऐकेल. तिला ऊर्जा वाचायला सांग. भावालाही वाचायला सांग म्हणजे त्यालाही घरकामाचं महत्व समजेल आणि तो स्वत:हून कदाचित करायला लागेल.