शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

काय ‘माकडचाळे’ चालवलेत तुम्ही हे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 07:20 IST

पाहाच करून हे माकडचाळे आणि दाखवा आपल्या आईबाबांनाही. त्यामुळे तुमच्यात किती ताकद आली ते!.

ठळक मुद्देयामुळे हातापायांत ताकद येईल.

. इकडे तिकडे उडय़ा मारायला, लोळायला, घरात समजा बेड, पलंग, सोफा अशा वस्तू असतील, तर खाली जमिनीवर पाय न ठेवता, पलंगावरुन बेडवर, बेडवरुन सोफ्यावर, सोफ्यावरुन खुर्ची किंवा टेबलवर. दाराला किंवा कुठेतरी लटकत, उडय़ा मारत आणि चालत जाण्याचा प्रयोगही तुमच्यापैकी अनेकांनी केला असेल. कित्ती मज्जा येते ना त्यात?पण आपल्या आईबाबांनी त्यात नक्कीच मोडता घातला असेल. ढुंगणावर सण्णकन एखादा रट्टाही ठेवला असेल. असलेच काही उद्योग आपण शाळेतही केले असतील आणि सगळ्यांकडून एकच ऐकलं असेल. काय ‘माकडचाळे’ चालवलेत तुम्ही हे? नीट माणसासारखं बसता येत नाही का?पण तुम्हाला सांगू?- या माकडचाळ्यांत किती मज्जा आहे, हे या मोठय़ांना कोण सांगणार? खरं तर असे माकडचाळे त्यांनी स्वत:ही त्यांच्या लहानपणी केले असतील. पण विसरले असावेत आता सगळे. हो, पण उडय़ा मारत आपल्या वस्तू, घर, शाळा खराब करणं चूकच. 

माकड कसं उडय़ा मारतं, एका फांदीवरुन दुस:या फांदीवर कसं लटकतं, इकडून तिकडे उडय़ा मारत पळतं, हे त्याचे ‘माकडचाळे’ म्हणजे एक अतिशय उत्तम असा व्यायामप्रकार आहे. मार्शल आर्टमध्येही याचा वापर केला जातो. हा व्यायाम खूप वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतो आणि त्यातली डिफिकल्टी लेवलही आपल्या सोयीनुसार आणि  वाढवता, कमी करता येते.कसा कराल हा व्यायाम?1- हा हालचालींचा एक प्रकार आहे. त्यातल्या त्यात सोपा प्रकार करु. गुडघे, हात, मुठी आणि पाय यांचा मुख्यत्वे वापर यात करायचा आहे. 2- उखड बसा. हातांच्या मुठी वळा. 3- अंग एकमद सैल सोडा. हातांच्या मुठी जमिनीवर टेकवा.4- शक्यतो सपाट, खाली खडे, दगड, गोटे नसतील अशी जागा निवडा. आपल्या हातांच्या मुठी जमिनीवर ठेवा.5- आता मुठींवर वजन देऊन आपलं शरीर उचला, एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, एकदा समोर अशा जमतील तितक्या उडय़ा मारा.यामुळे काय होईल?1- यामुळे हातापायांत ताकद येईल.2- आपली लोअर बॉडी स्ट्रॉँग होईल.3- शरीराची लवचिकता वाढेल.4- तुम्ही अधिक सतर्क आणि चपळ व्हाल. पाहाच करून हे माकडचाळे आणि दाखवा आपल्या आईबाबांनाही. त्यामुळे तुमच्यात किती ताकद आली ते!.- तुमचीच माकडांची राणी, ऊर्जा