शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कुणासाठी तरी स्पेशल गिफ्ट बनवायचं आहे ? ही घ्या आयडिया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 18:56 IST

करायला एकदम सोप्पे आणि गिफ्ट द्यायला एकदम भारी!

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

तुम्ही नियमित पुस्तकं वाचता?मग सध्याच्या वेळाचा उपयोग करून तुम्ही सुंदर बुकमार्क्‍स बनवू शकता. जे पुढे तुम्हाला स्वत:ला तर वापरता येतीलच पण मित्रमैत्रिणींना किंवा इतर कुणालाही तुम्हाला भेट देता येतील. एरवी कागद, पुठ्ठा उभा कापून आपण बुक मार्क्‍स बनवतोच पण काही वेगळ्या कल्पना राबवून बघायला काय हरकत आहे?

प्रकार 1 साहित्य: घरात असलेली तीन रंगांची लोकर आणि एक मोठ्या आकाराचं बटण. कृती: 1) तीन रंगांच्या लोकरीची वेणी घाला. 2) सर्वसाधारण पुस्तकाची उंची लक्षात घेऊन त्यापेक्षा थोडी मोठी वेणी आपल्याला घालायची आहे. वेणी 12 इंच तरी हवी. 3) वेणी कशी घालायची ते घरात कुणालाही विचारा, मोठे तुम्हाला नक्की मदत करतील. 4) वेणी निम्म्याहून अधिक झाली की तिन्ही लोकरींमधून बटण छानपैकी ओवा. बटणाचा चारही भोकांमधून लोकर गेली पाहिजे. 5) त्यानंतर खाली पुन्हा वेणी घाला आणि शेवटी घट्ट गाठ मारा म्हणजे वेणी सुटणार नाही. 6) ही वेणी तुम्ही बुकमार्कसारखी वापरू शकता. 

प्रकार 2साहित्य: आईस्क्रीममधली स्टिक किंवा कुठलीही काडी, लाकडी चमचा, रंग, जाड कागद. कृती: 1) स्टिक/ काडी/ लाकडी चमचा जे काही तुमच्याकडे असेल ते स्वच्छ धुवून, पुसून घ्या. ओलेपणा आजिबात नको.2) आता त्याला तुमचा आवडता रंग लावा. त्यावर डिझाईन किंवा डुडलही तुम्ही करू शकता. 3) जाड कागदाचे तुम्हाला हवे ते आकार बनवून घ्या. गोल, त्रिकोण, चौकोन किंवा इतर कुठलाही आकार. 4) या आकारांना एकतर तुम्ही नाकडोळे काढून काटरून लूक देऊ शकता किंवा मग त्यावर छान छान कोट्स, शब्द लिहू शकता. 5) आकार वाळले की ते काडीच्या वरच्या टोकाला चिकटवा. झाला तुमचा बुकमार्क.  6) पुस्तकात ठेवताना आकार पुस्तकाच्या बाहेर ठेवा.