शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

टण टणाटण टणटण टारा, साईड हॉप्स मारो जरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:38 IST

चला, आज मारा टणाटण उडय़ा!

मला माहीत आहे, आई-बाबांनी कितीही सांगितलं, तरी उडय़ा मारायचं तुम्ही थांबवलं नसेल.उडय़ा मारायला सगळ्यांनाच आवडतं, हेही मला माहीत आहे. त्यामुळे मागे तुम्हाला उडय़ा मारण्याचा एक व्यायाम शिकवला होता.घरात नुसत्या उडय़ा मारण्याबरोबरच उडय़ा मारण्याचा तो व्यायाम तुम्ही करतच असाल.करताय ना?काय म्हणता? फार आवडला तुम्हाला तो व्यायाम?चला, मग आज मी तुम्हाला आणखी एक हटके व्यायाम शिकवणार आहे.

हा व्यायामही उडय़ा मारायचाच आहे आणि पहिल्यापेक्षा भारी. म्हणजे या उडय़ा मारायला तुम्हाला जास्त मजा येईल. वेगवेगळ्या पद्धतीनं उडय़ा मारायची एक यादीच मग तुमच्याकडे तयार होईल.आजच्या उडीचं नाव आहे, ‘साइड हॉप्स’. मराठीत याला म्हणायचं ‘टणाटण उडय़ा’!शिकायचा हा व्यायाम?कशा माराल उडय़ा?1- अगदोर सरळ ताठ उभे राहा.2- दोन्ही पाय जुळलेले. अगदी एकमेकांना चिकटलेले नसले तरी चालेल, पण शेजारी शेजारी हवेत. त्यात फार अंतर नको. 3- हात कंबरेवर ठेवा. क्यात आणखी एक गंमत आहे. हातांची वेगवेगळ्या पद्धतीनं हालचालही तुम्ही करू शकता. म्हणजे डावीकडे उडी मारली की उजवा हात वर घ्यायचा आणि उजवीकडे उडी मारली की डावा हात वर घ्यायचा.) आधी हात कंबरेवरच राहू द्या. नंतर तुम्हाला एक-एक प्रकार करून पाहता येईल. 4- आता हात कंबरेवरच ठेऊन तुम्हाला एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे उडी मारायची आहे. 5- पण कुठेही नाही मारायची उडी. दोन्ही बाजूच्या उडय़ा समान अंतरावर पडल्या पाहिजेत. त्यासाठी डोळ्यांनीच अंतर ठरवून घ्या किंवा त्यासाठी जमिनीवर तुम्हाला एखादी खूणही करता येईल.6- दोन्ही बाजूला दहा-दहा उडय़ा मारा. असे तीन सेट करा.7- पण लक्षात ठेवा, उडी फार जोरात मारायची नाही. आपले पाय जमिनीवर अलगद पडले पाहिजेत.  काय फायदा या उडय़ांचा?1- पायाचा सर्वागीण व्यायाम यामुळे होईल.2- तुमच्या पोट:या मस्त तयार होतील.3- मांडय़ांच्या मागच्या भागात ताकद येईल. 4- मांडय़ांच्या साइडचा भाग दणकट होईल.माराल मग या उडय़ा?- तुमचीच ‘टणाटण’ मैत्रीण ऊर्जा