शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

आजी-आजोबांना घट्ट मिठी मारता यावी म्हणून पेगीने तयार केला 'हग कर्टन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 17:44 IST

पेगीच्या आईनं तिला आपल्या आजी आजोबांना मिठी मारायची नाही असं बंधन घातलं.

ठळक मुद्दे हा हग कर्टन वापरून पेगीनं आपल्या आजीआजोबांना मिठी मारण्याची इच्छा पूर्ण केली.

पेगी नावाची दहा वर्षाची मुलगी. ती कॅलिफोर्नियामधील रिव्हरसाइड या शहरात राहाते. जेव्हापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हापासून तिच्या आईनं तिला आपल्या आजी आजोबांना स्पर्श करायचा नाही. त्यांना मिठी मारायची नाही अशी अट घातली.  तिची आई लिंडसे ओक्रे  ही नर्स असून  रिव्हरसाइड येथील एका कम्युनिटी हॉस्पिटलमधे कोरोना रूग्णांची काळजी घेण्यासाठी बनवण्यात आलेल्या युनिटमधे काम करते. कोरोनाच्या काळात घरातील वृध्दांना जपणं गरजेचं आहे म्हणून पेगीच्या आईनं तिला आपल्या आजी आजोबांना मिठी मारायची नाही असं बंधन घातलं.पेगीला परिस्थितीचं गांभीर्य कळल्यामुळे तिनंही आपल्या आईची सूचना पाळली. पण आपल्या आजी आजोबांना मिठी न मारण्याच्या अटीमुळे ती फारच दु:खी होती. आपल्या आजी आजोबांनी आपल्या कवेत घ्यावं, आपले लाड करावेत असं तिला सारखं वाटत होतं. पण कोरोनामुळे ती ते करू शकत नव्हती. पण इंटरनेटवर वाचता वाचता तिला एक  छान पर्याय सापडला.  आपल्या प्रिय व्यक्तींना मिठी मारण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे पर्याय शोधले होते. पेगीलाही एक पर्याय मिळाला. शॉवर कर्टनला मॉडिफाय करून ‘हग कर्टन’ बनवण्याची युक्ती तिला सूचली. तिनं ही कल्पना आपल्या आईला सांगितली. तिच्या आईलाही ही कल्पना आवडली. मग दोघींनी मिळून या पडद्यावर काम करायला सुरूवात केली.  घरातील शॉवर कर्टन, झिप  लॉक पाऊचेस आणि डिंक यां़चा वापर करत  पेगीनं  ‘हग कर्टन’ तयार केला.तो कर्टन दाराला लावला. पडद्याच्या एका बाजूला ती उभी राहिली आणि पडद्याच्या दुस :या बाजूला तिचे आजी आजोबा उभे राहिले.  पडद्याला तिनं चार मोठी भोकं केली होती. ज्यातून हात  घालून एकमेकांना मिठी मारण्याचा आनंदही घेता येईल आणि शरीराचा स्पर्शही टाळता येईल. हा हग कर्टन वापरून पेगीनं आपल्या आजीआजोबांना मिठी मारण्याची इच्छा पूर्ण केली. आपल्या नातीनं शोधलेली ही कल्पना तिच्या आजी आजोबांनाही खूप आवडली. आपल्या प्रिय माणसांना भेटण्य़ाची पेगीनं शोधून काढलेली युक्ती अनेकांना आवडतो आहे. तिच्या आईनं  हग कर्टनचा वापर करून मिठी मारण्यावर बनवलेला व्हिडीओ फेसबुकवर टाकल आहे. हा व्हिडीओ खूप जणांऩा आवडतो आहे.पेगीचं सगळीकडून कौतुक होत आहे. 

--------------------------------------------