आज वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day). हा दिवस त्या लोकांसाठी फार खास आहे, ज्यांना वेगळे आणि हटके फोटोग्राफी करायला नेहमीच आवडते. आपल्या समोर एखादं सुंदर  किंवा हटके दृश्य पाहिलं की, त्यांना ते कॅमेऱ्यामध्ये कैद केल्याशिवाय राहवत नाही. भारतामध्ये संस्कृती, भाषा आणि निसर्ग यांसारख्या अनेक सुंदर गोष्टी पाहायला मिळतात. फोटोग्राफर्ससाठीही भारत एखाद्या खजान्यापेक्षा कमी नाही. कारण त्यांना येथील प्रत्येक गोष्टीमध्ये फोटोग्राफीसाठी काहीतरी सापडतचं. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भारतातील खास लोकेशन्सबाबत सांगणार आहोत. जे फोटोग्राफीसाठी उत्तम मानले जातात. 

लडाख

लडाखला ट्रिपसाठी जाणं हे आपल्यापैकी बऱ्याचजणाचं स्वप्न असतं. उत्तरेकडिल काराकोरम पर्वत आणि दक्षिणेकडिल हिमालय पर्वतामध्ये स्थित हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे. येथील अनेक ठिकाणं तुम्हाला बेस्ट क्लिक मिळवून देण्यासाठी सुंदर ठरतील. खरं तर फोटोग्राफर्ससाठी हे लोकेशन्स जणू काही स्वर्गचं... 

राजस्थान 

भारतातील सर्वा मोठं राज्य असलेलं राजस्थानही फोटोग्राफीसाठी बेस्ट ठरतं. येथील किल्ले, हवेल्या आणि संस्कृती तुम्हाला खरचं प्रसन्न करतील. उदयपूर आणि जयपूरमधील किल्ले असो किंवा थारचं वाळवंट फोटोग्राफीसाठी अनेक उत्तम पर्याय येथे मिळतील. 

आगरा

आगरा येथील ताजमहाल म्हणजे, देशातील पर्यटकांसोबतच विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू. याशिवाय अनेक ऐतिहासिक वास्तू येथे फोटोग्राफीसाठी उत्तम ठरतात. 

वाराणसी 

वाराणसी आपल्या अध्यात्मिक महत्त्वासाठी ओळखलं जातं. येथे तुम्हाला अनेक यूनिक आणि क्लासी फोटो घेण्यासाठी क्लासी लोकेशन्स आहेत. गंगा नदीच्या किनाऱ्यावर सूर्योदय पाहणं आणि तो कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा अनुभव अत्यंत सुखद असले. 

केरळ 

केरळला God's own country असं म्हटलं जातं. बॅकवॉटर, किल्ले, समुद्र किनारे, पाम ट्री आणि चर्च हे पाहण्यासाठी केरळ फार सुंदर ठिकाण आहे. येथे निसर्गाचे अनेक क्लासी फोटो तुम्हाला काढता येतील. 


Web Title: World Photography Day 2019 best locations in india for photography
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.