एखादी ट्रिप प्लॅन करण्याचा विचार मनात येतो, त्यावेळी दक्षिण भारतातील ठिकाणांना प्रामुख्याने पसंती देण्यात येते. दक्षिण भारतात अनेक ठिकाण आहेत, जी तुमची ट्रिप खास करण्यासाठी मदत करतील. येथे तुम्ही निसर्गसौंदर्यासोबतच इतरही अनेक गोष्टींचा आनंद लूटू शकता. या ठिकाणांपैकी एक असलेलं ठिकाण म्हणजे, आंध्रप्रदेशमधील नेल्लोर शहर. नेल्लोर दक्षिण भारतातील प्राचीन शहरांमध्ये गणलं जातं. येथे तुम्हाला फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. आज आम्ही तुम्हाला नेल्लोरमधील काही खास ठिकाणांबाबत सांगणार आहोत. 

पुलीकट सरोवर

पुलीकट सरोवर जवळपास 600 मीटर अंतरापर्यंत पसरेलं आहे. हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खार्‍यापाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर आंध्र प्रदेश व तमिळनाडु यांच्या सीमा वेगळं करतं. या सरोवरात पुलीकत पक्षीअभयारण्य आहे. याव्यतिरिक्त तुम्ही येथे फिरण्याचा आनंद घेऊ शकता. पुलीकट सरोवरला 1976मध्ये पक्षी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला होता. अनेक पर्यटक येथे आवर्जुन भेट देतात. 

नेलापट्टू पक्षी अभ्यारण 

नेल्लोरला जात असाल तर तुम्ही नेलापट्टू पक्षी अभयारण्य पाहू शकता. हे अभयारण्य येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे मोठ्या प्रणाणात पर्यटक येत असतात. नेलापट्टू पक्षी अभयारण्यामध्ये देशी पक्षांव्यतिरिक्त अनेक प्रवासी पक्षीही तुम्हाला पाहायला मिळतील. 

उदयगिरीचा किल्ला 

तुम्ही नेल्लोरला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही निसर्गसौंदर्याने नटलेल्या अनेक ठिकाणांसोबत ऐतिहासिक स्थळांनाही भेट देऊ शकता. येथे फार उंचावर स्थित असलेला उदयगिरीचा किल्ला प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. नेल्लोरपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर हा किल्ला असून हा किल्ला 14व्या शतकामध्ये उभारण्यात आला होता. जर तुम्ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता. 

वेंकटगिरीचा किल्ला 

नेल्लोरजवळच वेंकटगिरीचा किल्ला आहे. हा किल्ला 1775मध्ये रचर्लाच्या राजांनी केलं होतं. जर तुम्ही नेल्लोर फिरण्यासाठी येत असाल तर वेंकटगिरीचा किल्ला फिरण्याचा प्लॅन नक्की करा. किल्याच्या आजूबाजूला अनेक नैसर्गिक ठिकाणं आहेत. तसेच वेंकटगिरी नगर सूती साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. 

श्री रंगनाथस्वामी मंदिर 

पन्नार नदीच्या किनाऱ्यावर उभारण्यात आलेलं श्री रंगनाथस्वामी का मंदिर 29 मीटर उंच आहे. मंदिराच्या मुख्या प्रवेशद्वारावर सोन्याचा कलश ठेवण्यात आलेला आहे. हे मंदिर पल्लव वंशतील राजांनी उभारलं होतं. मंदिरामध्ये एक आरशांची खोली असून तिथे देवाचं सिंहासन ठेवण्यात आलं आहे. जेव्हा या सिंहासनावर मूर्ती ठेवण्यात येते, त्यावेळी याच्या चारही बाजूंना प्रतिबिंब दिसतं. 


Web Title: Visit these places if you going nellore in India
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.