शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

नैसर्गिक सौंदर्य भुरळ पाडेल... असं, लय भारी फुकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 18:41 IST

फुकेत हे सुद्धा थायलँडमधील सर्वात रोमॅंटिक ठिकाणांपैकी एक आहे. खरं तर थायलँड भारतापासून अत्यंत जवळ आहे. त्यामुळे हे शहर वर्षभर पर्यटकांनी गजबजलेलं असतं.

फुकेत हे सुद्धा थायलँडमधील सर्वात रोमॅंटिक ठिकाणांपैकी एक आहे. खरं तर थायलँड भारतापासून अत्यंत जवळ आहे. त्यामुळे हे शहर वर्षभर पर्यटकांनी गजबजलेलं असतं. फुकेतमधील समुद्र किनारे पर्यंटकांना फार आकर्षित करतात. क्रिस्टलसारखं स्वच्छ आणि चमकतं पाण्याच्या समुद्र किनाऱ्यावर दूरदूरपर्यंत पसरलेली ताडाची झाडे डोळ्यांना वेगळाच आनंद देतात. हे ठिकाण रोमॅन्टिक ठिकाण म्हणून ओळखलं जातं. येथील अल्हाददायी हवेतच गारवा आहे, असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. 

ज्या लोकांना जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी फिरायला आवडत नाही, त्यांच्यासाठी फुकेत हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. परंतु येथे थंडीमध्ये गेलात तर येथे तुम्हाला फार गर्दी मिळते. त्यानंतर येथे एप्रिल मे पर्यंत उन्हाळा असतो आणि जूनपासून ऑक्टोबरपर्यंत पावसाळा असतो. 

जेव्हाही तुम्ही फुकेतला भेट द्याल त्यावेळी  फांग नगा बे आणि  जेम्स बॉन्ड यांसारख्या बेटांना भेट द्यायला विसरू नका. जेम्स बॉन्ड सीरीजमधील 'मॅन इन द गोल्डन गन' या भागाची शूटिंग या बेटावर झाली होती. म्हणूनच या बेटाला जेम्स बॉन्ड असं म्हणतात. जर तुम्हाला येथे समुद्राच्या आतील जग अनुभवण्याची इच्छा असेल तर येथे तुम्ही स्कूबा डायविंगचाही आनंद घेऊ शकता. येथे तुम्हालाशार्क, ऑक्टोपस आणि इतर रंगीबेरंगी मासे पाहण्याची संधी मिळेल.  

फुकेतमध्ये राहणे अजिबात महाग नाही. इथे तुम्ही आरामात 2 ते 3 दिवस घालवू शकता. इथे तुम्ही स्पा चा आनंदही घेऊ शकता. तसेच जवळच असलेल्या 4 आयलॅंडवरही फिरायला जाता येऊ शकतं.

फुकेतच्या आसपास अनेक छोटी छोटी बेटं असून यांपैकी फेमस बेट म्हणजे, फि फिद्विप आहे. येथे येणारे पर्यटक रात्रभर येथे राहून रात्रीच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेतात. 

थायलँडमधील सर्वात सुंदर बेटांपैकी एक बेट म्हणजे फुकेट. त्यामुळे तुम्हीही एखाद्या बेटावर जाऊन आपला हॉलिडे एन्जॉय करण्याचा विचार करत असाल तर फुकेतमध्ये फिरायला जाण्याचा नक्की प्लॅन करा. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन