शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल बिघाड

By admin | Updated: April 10, 2015 23:29 IST

सिग्नल बिघाडपश्चिम आणि मध्य रेल्वेचा बोर्‍याप्रवाशांना मनस्तापमुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर बिघाडाची परंपरा सुरुच असून त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावर आणि दुपारी मध्य रेल्वे मार्गावर सिग्नल बिघाड झाला आणि या बिघाडाने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. या दोन्ही मार्गांवरील लोकल वीस मिनिटे उशिराने धावत होत्या. ...



सिग्नल बिघाड
पश्चिम आणि मध्य रेल्वेचा बोर्‍या
प्रवाशांना मनस्ताप
मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर बिघाडाची परंपरा सुरुच असून त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावर आणि दुपारी मध्य रेल्वे मार्गावर सिग्नल बिघाड झाला आणि या बिघाडाने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. या दोन्ही मार्गांवरील लोकल वीस मिनिटे उशिराने धावत होत्या.
सकाळी सव्वा नऊच्या सुमारास अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान अप धीम्या मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि या बिघाडाने कामावर जाणार्‍या चाकरमान्यांचे चांगलेच हाल केले. बिघाडाची माहीती मिळताच पश्चिम रेल्वेच्या तांत्रिक कर्मचार्‍यांनी सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचे काम हाती घेतले. तोपर्यंत अप धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळविण्यात आल्या. त्याचा फटका आणखीणच बसत गेल्याने लोकल वीस मिनिटे उशिराने धावू लागल्या. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणार्‍या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली. अनेक प्रवासी लोकलची प्रतिक्षा करताना दिसत होते. सिग्नल यंत्रणेतील बिघाड अर्धा तासात दुरुस्त करण्यात आल्यानंतर अप धीमा मार्ग पुर्ववत करण्यात आला. मात्र या बिघाडामुळे दुपारपर्यंत पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीतच राहिले. या बिघाडाने प्रवासी हैराण झालेले असतानाच दुपारी ३.३५ च्या सुमारास मुलुंड स्थानकाजवळील अप जलद मार्गावरही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि जलद मार्गावरील प्रवाशांचा प्रवास चांगलाच रखडला. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी चारही मार्गावरील सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्यात आली आणि त्याचा फटका सर्वच मार्गावरील लोकल सेवांना बसला. त्यामुळे लोकल वीस मिनिटे उशिराने धावत होत्या, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. हा बिघाड त्वरीत दुरुस्त करण्यात आल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास लोकल सेवा पुर्ववत करण्यात आला. पंरतु या घटनेमुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीतच होती. दोन्ही मार्गांवरील घटनेत लोकल रद्द झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.