प्रियांका-निकने 'या' देशात साजरा केला मिनी हनीमून, जाणून या ठिकाणाची खासियत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 11:57 IST2018-12-12T11:53:51+5:302018-12-12T11:57:07+5:30
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास लग्नानंतर त्यांच्या हमीमूनसाठी रवाना झाले आहेत. प्रियांका चोप्राच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे ते हनीमूनला गेल्याचे कळाले.

प्रियांका-निकने 'या' देशात साजरा केला मिनी हनीमून, जाणून या ठिकाणाची खासियत!
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास लग्नानंतर त्यांच्या मिनी हनीमूनसाठी गेले होते. प्रियांका चोप्राच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे ते हनीमूनला गेल्याचे कळाले. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या लग्नाच्या धावपळीतून त्यांना वेळ मिळाला असून दोघेही फार आनंदी दिसत आहेत.
प्रियांका चोप्राच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन अंदाज लावले जात आहे की, दोघेही हनीमूनसाठी अरब देश ओमानमध्ये होते. या पोस्टमधील फोटोत प्रियांकाने समुद्र किनाऱ्यावरील वाळूमध्ये एक हार्ट रेखाटला असून त्यात एनजे म्हणजेच निक जोनास आणि पीसीजे म्हणजेच प्रियांका चोप्रा असे लिहिले आहे. हा मिनी हनीमून करुन ते मुंबईला परतले सुद्धा आहेत.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी १ आणि ३ डिसेंबरला राजस्थानच्या जोधपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. त्यानंतर दोघांनीही दिल्लीच्या ताज पॅलेसमध्ये रिसेप्शन दिलं. त्यानंतर ते मुकेश अंबानींची मुलगी निशा अंबानीच्या संगीत समारोहात दिसले. येथूनच ते थेट ओमानला गेल्याचं बोललं जात आहे.
या ठिकाणांमुळे ओमान आहे बेस्ट हनीमून डेस्टिनेशन
१) मस्कट
ओमानमध्ये हनीमूनची सुरुवात मस्कटपासून केली गेली पाहिजे. इथे प्रसिद्ध सईद बिन तैमुर मस्जिद आहे. ही मस्जिद आपल्या सुंदरतेसाठी लोकप्रिय आहे. येथून १० मिनिटांच्या अंतरावर शत्ती-अल-कुरुम बीच आहे. हा बीच जगातल्या सर्वात सुंदर बीचपैकी एक मानला जातो. या बीचपासून ४ किमी अंतरावर रॉयल ओपेरा हाऊस आहे. इथे तुम्ही ओमानमधील कलाविष्कार बघू शकता.
मस्कटमध्ये अल आलम नावाचा एक शाही महल आहे. हा महल मस्कटची शान मानला जातो. या महलामध्ये सर्वसामान्य लोकांना जाण्याची परवानगी नसली तरी या महलाच्या आजूबाजूला तुम्ही फेरफटका मारु शकता. इथूनच तुम्हाला महलाची सुंदरताही बघता येऊ शकते.
२) निजवा
मस्कटनंतर निजवा हे ठिकाण शानदार महलांनी भरलेली आहे. कलेची एकापेक्षा चांगली ठिकाणे तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. निजवा फोर्ट, जब्रीन कासल,अल हूटाची गुहा, सुलतान कबूसची मस्जिद या जागांवर तुम्ही भेट देऊ शकता. जर तुम्हाला इतिहास जाणून घेण्यात रस असेल तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता.
३) अल हजरचे डोंगर
डोळ्यांना वेगळा अनुभव देण्यासाठी तुम्ही अल हजरच्या डोंगरांना भेट शकता. अल हजरचे डोंगर हे ओमानमधील सर्वात विशाल डोंगरांपैकी एक आहेत. इथेच मिस्फत अल अबरियन नावाचं एक गावही आहे. हे गाव छोट्या छोट्या सुंदर डोंगरांमुळे आणि त्यावर तयार तितक्याच सुंदर घरांमुळे प्रसिद्ध आहे. इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात आराम करण्यासाठी येतात. इथे खवय्यांसाठी खाण्या-पिण्याचीही चांगलीच चंगळ आहे.
४) वाडी बाणी खालिद
निजवापासून २२१ किमी दूर अंतरावर वाडी बाणी खालिद नावाचं एक ठिकाण आहे. हे ओमानमधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. इथे लोक हायकिंग, रॉक क्लायम्बिंग, स्वीमिंग करण्यासाठी येतात. त्यासोबतच काही लोक केवळ येथील नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठीही येतात.
५) सलालाह
सलालाह हे सुद्धा ओमानमधील एक सुंदर शहर आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात इथे जोरदार पाऊस असतो. त्यामुळे हे शहर पाण्याने भरलेलं असतं. मात्र याच दरम्यान इथे फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. हे फेस्टिव्हल बघण्यासाठी जगभरातील लोक इथे गर्दी करतात.