ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:58 IST2025-12-05T13:33:59+5:302025-12-05T13:58:49+5:30
Most Searched Town on Google : गुगलच्या वार्षिक सर्च अहवाल २०२५ नुसार, भारतीय प्रवाशांच्या प्रवासाच्या पसंती बदलल्या आहेत. गोव्याचे समुद्रकिनारे किंवा काश्मीरच्या खोऱ्या या वर्षी सर्वाधिक शोधले जाणारे ठिकाण नव्हते, त्याऐवजी, भारतीयांनी आध्यात्मिक प्रवासात सर्वाधिक रस दाखवला आहे.

ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
आपण प्रत्येक वर्षी फिरायला जाण्याचा प्लॅन करतो. यासाठी आपण सर्वात आधी गोवा, काश्मीर, केरळ या ठिकाणांचा विचार करतो. २०२५ हे वर्ष संपत आले असून 'गुगल'ने त्यांचा सर्च अहवाल प्रसिद्ध केला आहे.
या अहवालात भारतीयांच्या मनात कोणत्या स्थळांना सर्वात जास्त आदर आहे हे उघड केले आहे. या वर्षी भारतीयांनी गोव्याचे समुद्रकिनारे किंवा काश्मीर सर्वाधीक गुगलवर सर्च केलेले नाही. २०२५ मध्ये, भारतीयांनी कुंभमेळ्याचा शोध घेतला. भारतीय प्रवासी आता शांतता आणि अनुभव शोधत आहेत आणि या शोधामुळे एक प्रमुख धार्मिक कार्यक्रम देशातील सर्वात मोठा प्रवास शोध बनला आहे.
महाकुंभमेळा भारतातील सर्वात मोठे प्रवास स्थळ बनले
भारतीयांनी व्हिएतनाम किंवा मालदीवचा सर्वात जास्त शोध घेतला असे तुम्हाला वाटले असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. २०२५ मध्ये महाकुंभमेळा हा भारतातील सर्वात ट्रेंडिंग प्रवास सर्च होता. महाकुंभमेळा केवळ भेट देण्यासारख्या ठिकाणांच्या यादीत अव्वल स्थानावर नव्हता, तर संपूर्ण वर्षभर टॉप ट्रेंडिंग बातम्या आणि शोधांमध्ये देखील स्थान मिळवले.
२०२५ चा महाकुंभ हा देशासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम ठरला. यातून भारतात आध्यात्मिक पर्यटन किती मजबूत झाले आहे हे स्पष्टपणे दिसून आले. महाकुंभाने भारताला जागतिक आध्यात्मिक नकाशावर मोठे स्थान दिले आहे. धार्मिक तीर्थयात्रा फक्त वृद्धांसाठी असतात, परंतु या महाकुंभाने मोठ्या संख्येने तरुण पिढ्यांनाही आकर्षित केले आहे.
हा महाकुंभमेळा फक्त धार्मिक मेळा नव्हता, तर तरुणांना भारताच्या प्राचीन आध्यात्मिक परंपरांशी जोडण्याची संधीही प्रदान करणारा होता. म्हणूनच वाराणसी, ऋषिकेश आणि बोधगया सारख्या ठिकाणांच्या प्रवासाच्या शोधात मोठी वाढ झाली. या वर्षी, प्रवास केवळ मंदिरांना भेट देण्यापुरता मर्यादित नव्हता; लोक सांस्कृतिक कथा, कला, संगीत, योग आणि तत्वज्ञानाकडे देखील आकर्षित झाले.
सोमनाथ सारखे मोठे तीर्थक्षेत्र देखील टॉप ट्रेंडिंग सर्च लिस्टमध्ये नवव्या स्थानावर पोहोचले. यावरुन भारतीय आता केवळ मनोरंजनासाठीच नव्हे तर तीर्थस्थळांनाही जास्त भेटी देतात हे सिद्ध होते.