४८ एकरात पसरलेलं सगळ्यात महागडं हॉटेल पाहिलं का? जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 04:43 PM2019-12-20T16:43:42+5:302019-12-20T17:27:27+5:30

प्रत्येकाला फिरण्याची आवड असते. तसंच फिरायला गेल्यानंतर तिथल्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच आहे.

Know the most expensive hotel spread over 48 acres | ४८ एकरात पसरलेलं सगळ्यात महागडं हॉटेल पाहिलं का? जाणून घ्या खासियत

४८ एकरात पसरलेलं सगळ्यात महागडं हॉटेल पाहिलं का? जाणून घ्या खासियत

Next

प्रत्येकाला फिरण्याची आवड असते. तसंच फिरायला गेल्यानंतर तिथल्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच आहे. जर तुम्हाला सुध्दा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायची आवड असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत ज्याठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला खवय्येगिरीचा आनंद घेता येईल. तसंच ऐतिहासीक वास्तु सुध्दा पाहता येतील.

भारतातील सगळ्यात मोठं हॉटेल राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे आहे.  भारतातल्या सगळ्या महागड्या हॉटेल्सपैकी ते हॉटेल आहे. रामबाग पॅलेस हे या हॉटेलचे नाव आहे. साल १८३५ मध्ये हॉटेल तत्कालीन राज्यांच्या राजेशाही थाटासाठी उभारण्यत आलं होतं. महाराजा सवाई आणि त्यांची पत्नी गायत्रीदेवी यांचे हे पूर्वीच्या काळातले निवासस्थान आहे. सुमारे ४८ एकरात हे हॉटेल  पसरले आहे. 

सध्याच्या काळात हे पॅलेस जगातील सगळ्यात महागड्या पॅेलेसपैकी एक आहे. या हेरिटेज वास्तूला हॉटेल्सच्या ग्रुप्सनीं घेतले आहे. या पॅलेसचे आर्किटेक्चर आणि त्याभोवतालचे गार्डन फारच आकर्षक आणि भव्य आहे. या रेस्टॉरंटला ज्वेल ऑफ जयपुर या नावाने ओळखले जाते. या हॉटेलचे इंटेरियर खूप सुंदर आहे. या हॉटेलमध्ये ७८ एअर कंडीशन एसी आहेत. 

 या हॉटेलच्या रुम्समध्ये मिनीबार सुध्दा आहेत. या हॉटेलमध्ये लॉर्ड माउंटबेटेन, जॅकलिन आणि  प्रिंस चार्ल्स यांसारखे दिग्गजांनी भेटी दिल्या आहेत. या हॉटेलचं रेंन्ट २४,०० रुपयांपासून सुरू होते. जास्तीतजास्त रेंन्ट ५ लाख रुपये इतके आहे . जर तुम्हाला रॉयल राजपूत हॉटेलचा आनंद घ्यायचा असल्यास तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. जगातल्या सगळ्या मोठ्या हॉटेलपैकी असलेले या हॉटेलला बेस्ट हॉटेल ऑफ वर्ल्ड  हा दर्जा प्राप्त झाला आहे. 

Web Title: Know the most expensive hotel spread over 48 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.