मे महिन्यात फिरण्यासोबतच एन्जॉय करू शकता हे ५ टूरिज्म फेस्टिव्हल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 12:49 IST2019-05-01T12:46:30+5:302019-05-01T12:49:18+5:30
मे महिना म्हटला की, अनेकजण वेगवेगळ्या हिल स्टेशनला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. याच दिवसात या ठिकाणांवर वेगवेगळ्या फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं.

मे महिन्यात फिरण्यासोबतच एन्जॉय करू शकता हे ५ टूरिज्म फेस्टिव्हल!
मे महिना म्हटला की, अनेकजण वेगवेगळ्या हिल स्टेशनला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. याच दिवसात या ठिकाणांवर वेगवेगळ्या फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. यात फिरण्याच्या आनंदासोबतच संस्कृती, निसर्गाला जाणून घेण्याची संधी मिळते. चला जाणून घेऊ कुठे कोणत्या फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे.
१) माउंट आबू समर फेस्टिव्हल
राजस्थानातील माउंट आबूमध्ये यावर्षी १७ ते १८ मे २०१९ दरम्यान समर फेस्टिव्हलचं आयोजन केलं जाणार आहे. माउंट आबू हे या भागातील एकमेक हिल स्टेशन आहे. उन्हाळ्यात इथे मोठ्या प्रमाणाच पर्यटक येतात. या फेस्टिव्हलदरम्यान राजस्थानची कला-संस्कृती आणि जीवनशैलीचे रंग बघायला मिळतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं.
२) ढुंगरी मेला
मनालीच्या हिडींबा मंदिरात ढुंगरी मेल्याचं आयोजन केलं जातं. या जत्रेचं आयोजन १४ ते १६ मे दरम्यान केलं जाईल. इथे तीन दिवस देवी हिडींबाच्या जन्मोत्सवाचा उत्सव साजरा केला जातो. हिडींबा ही पाच पांडवांपैकी भीमाची पत्नी होती. इथेही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
३) उटी समर फेस्टिव्हल
तामिळनाडूतील उटीमध्ये या फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. यावेळी हा फेस्टिव्हल १७ ते २१ मे दरम्यान फ्लॉवर फेस्टिव्हल तर २५ ते २६ मे दरम्यान फ्रूट फेस्टिव्हलचं आयोजन केलं जाईल. उन्हाळ्यात इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हा फेस्टिव्हल मेजवानी प्रमाणेच ठरतो.
४) त्रिशूर पूरम
केरळमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या त्रिशूरला इथे फार महत्त्व आहे. त्रिशूरचं आयोजन वडक्कमनाथन मंदिरात केलं जातं. यावर्षी १३ मे रोजी त्रिशूर पूरमचं आयोजन केलं जाणार आहे. यात ३० हत्ती, २५० पेक्षा अधिक संगीतकार-गायक आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात.
५) इंटरनॅशनल फ्लॉवर फेस्टिव्हल
सिक्कीमची राजधानी गंगटोक शहरातील राज्यपाल निवासात या फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. यावर्षी हा फेस्टिव्हल १ मे ते ३१ मे दरम्यान चालणार आहे. हा फेस्टिव्हल फुल आणि झाडांच्या जागरूकतेसाठी केला जातो. इथे वेगवेगळ्या प्रकारची फुले बघायला मिळतील.