air vistara anniversary 1299 offers announces discount ticket sale on completion of six years of flying in domestic route | केवळ १२९९ रूपयांमध्ये करा हवाई सफर; ही विमान कंपनी देतेय भन्नाट ऑफर

केवळ १२९९ रूपयांमध्ये करा हवाई सफर; ही विमान कंपनी देतेय भन्नाट ऑफर

ठळक मुद्दे 'द ग्रेट सिक्स्थ अॅनिव्हर्सरी सेल' अंतर्गत मिळणार स्वस्तात प्रवासाची संधीआज आणि उद्या प्रवाशांना तिकिट बुक करण्याची संधी

जर तुम्हाला विमान प्रवासाची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. भारतातील प्रमुख विमान कंपन्यांपैकी एक एअर विस्तारानं आपल्या प्रवाशांसाठी एक जबसदस्त ऑफर आणली आहे. विस्तारानं प्रवाशांसाठी 'द ग्रेट सिक्स्थ अॅनिव्हर्सरी सेल'ची सुरूवात केली आहे. या अंतर्गत इकॉनॉमी क्लासमध्ये १२९९ रुपयांत देशभरात कोणत्याही ठिकाणी प्रवासाची संधी देण्यात येत आहे. तर दुसरीकडे प्रिमिअम इकॉनॉमीसाठी प्रवाशांना २०९९ रुपये आणि बिझनेस क्लासच्या तिकिटांसाठी प्रवाशांना ५९९९ रूपये मोजावे लागणार आहेत. ८ आणि ९ जानेवारी रोजी बूक करण्यात येणाऱ्या तिकिटांवरच ही ऑफर मिळणार आहे. तसंच प्रवाशांना २५ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर दरम्यान देशभरात प्रवास करता येणार आहे. 

एअर विस्ताराच्या 'द ग्रेट सिक्स्थ अॅनिव्हर्सरी सेल' अंतर्गत केवळ या दोनचं दिवसांत प्रवाशांना तिकिट आरक्षित करता येणार आहे. ८ आणि ९ जानेवारीदरम्यान बुकिंग खुलं राहणार आहे. या ऑफर अंतर्गत प्रवाशांना २५ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच प्रवास करता येईल. विस्तारानं दिलेल्या माहितीनुसार ऑफरवर ब्लॅक आउट डेट्सदेखील लागू होणार आहेत. ब्लॅक आऊट डेट्सचा अर्थ ज्या दिवशी प्रवाशांची मोठं संख्या असेल त्या दिवशी कोणत्याही प्रकारची ऑफर लागू होणार नाही. या ऑफर अंतर्गत दिल्ली ते लखनौपर्यंतचं इकॉनॉमी क्लासच्या तिकिटांचे दर १८४६ रूपये, प्रिमिअम क्लासचे दर ३०९६ रूपये आणि बिझनेस क्लासच्या तिकिटांचे दर ११,६६६ रूपये असेल. तर मुंबई ते अहमदाबाद दरम्यान इकॉनॉमी क्लासच्या तिकिटांचे दर १८६६ रूपये, प्रिमिअम इकॉनॉमी क्लासचे दर २९४६ रूपये आणि बिझनेस क्लासच्या तिकिटांचे दर १२,९६६ रूपये असणार आहे.

Web Title: air vistara anniversary 1299 offers announces discount ticket sale on completion of six years of flying in domestic route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.