राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुणे शहरातही गेल्या तीन दिवसांपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. विदर्भातील काही भाग वगळता राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे मध्यम ते तीव्र पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला. ...
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात मुसळधार पाऊस पडत नसल्याने लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये आज केवळ ३३ टक्के जलसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्प १८ ऑगस्ट रोजी कोरडी आहेत. त्य ...
मांजरा नदीच्या उगम क्षेत्रातील पाटोदा महसूल मंडळात शनिवारी सकाळी अतिवृष्टी झाल्याने पाण्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सकाळी सहा वाजता सात टक्के पाणीसाठा होता. त्यात झपाट्याने वाढ होऊन दुपारी तीननंतर ९.२२ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. ...