निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील ३४ गावांमध्ये ३७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, या गावांमधील ७३ हजार ३९८ ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविण्यात येत आहे. ...
शनिवारपासून प्रत्यक्षात पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्यापही हटली नसून ग्रामीण भागातील ९४ टंचाईग्रस्त गावांना ९४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या संख्येवरुनच यावर्षीच्या पाणीटंचाई गांभीर्य समोर येत आहे. ...
पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ४०७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे़ त्यापैकी ८३ विहिरींचे पाणी टँकरसाठी तर ३२४ विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले आहे़ ...
अकोला : पाणी पुरवठ्याच्या कामांत यापूर्वी झालेल्या चुका सुधारून जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी गुरुवारी येथे दिले. ...