वाशिम : आमदार राजेंद्र पाटणी यांनीही शासनदरबारी प्रयत्न केल्याने अखेर बॅरेजेस परिसरात वीज सुविधा उभारण्यासाठी जलसंपदाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सदर रकमेचा धनादेश ५ एप्रिल रोजी महावितरणकडे सुपूर्द केला. ...
वाशिम: रास्तभाव दुकानदार, केरोसिन विक्रेत्यांना बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नेमणूक देण्याच्या राज्य शासनाच्या संकल्पनेला वाशिम जिल्ह्यात तडा जात असल्याचे दिसून येते. ...
वाशिम : यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असून १३१ पैकी ७८ प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्येही उणापूरा १० टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून ५ मार्च रोजी जाहीर झालेल्या अहवालावरू ...
वाशिम - ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, आठ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूरवरून तिवळी या गावी दुचाकी वाहनाने जात असताना पाठीमागे बसलेल्या महिलेची साडी अचानकपणे वाहनाच्या मागच्या चाकात अडकल्याने अपघात झाला. ...
कारंजा : नगर पालिकेची नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अर्थसहाय्य योजने अंतर्गत शासनाने कारंजा नगर परिषदेला ५ कोटी रूपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली . ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्यात वाशिम जिल्हा हा अमरावती विभागात अव्वल ठरला असून, अकोला जिल्हाची शेकडा टक्केवारी सर्वात कमी आहे. ...