लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
मुस्लिमांनी एकत्र येत एकजूट दाखवली तर नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होईल असं विधान नवजोत सिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहार येथे जनसभेला संबोधित करताना केलं आहे. ...
शाळा-शाळांमधून घेतलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील ८ लाख लोकांना बचत गट, पालक, शासकीय कर्मचारी, युवा मतदार यांना मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली आहे. ...
विरोधकांना देशद्रोही ठरवणे आणि जात, धर्म, भाषेच्या आधारावर देशातील नागरिकांत फूट पाडणे ही पद्धत केवळ शास्त्रज्ञांसाठीच नसून लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे ...
डॉ. जयसिध्देश्वरांनी कुण्या ग्रामपंचायतीची, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली नसताना थेट खासदारकीसाठी उभे आहेत, ही विसंगत बाब असल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. ...
गडचिरोलीतील चार मतदान केंद्रांवर सोमवारी (15 एप्रिल) फेरमतदान घेण्यात येत आहे. नक्षली कारवायांमुळे मतदान होऊ न शकल्याने हे फेरमतदान घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. ...
स्वीप अंतर्गत परभणी विधानसभा मतदारसंघात कला पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने निवडणूक विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ४ एप्रिलपास ...